Press "Enter" to skip to content

देवरे विद्यालयाचे ‘हर घर तिरंगा’ मोहिमेंतर्गत गावात पथनाट्याचे सादरीकरण

सिटी बेल ∆ रामकृष्ण पाटील ∆ नंदुरबार ∆

श्री.आप्पासाो.आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण येथे भारतीय स्वातंत्र्याच्या “अमृत महोत्सव वर्ष” साजरे करतांना भारत सरकारच्या “हर घर तिरंगा” या मोहीमे अंतर्गत विखरण गावात रॅलीचे आयोजन करण्यात आले.

रॅलीचे उद्घाटन विखरण गावाच्या प्रथम नागरिक,सरपंच छाया बापू पाटील, गावाच्या पोलीस पाटील दिपमाला प्रकाश पाटील, खोंडामळी केंद्राचे केंद्रप्रमुख संजय कुवर, बापु विश्राम पाटील, दामु पाटील,भाग्योदय पाटील, दगा मराठे, धीरज पाटील, ललित पाटील, हर्षल पाटील, विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.डी. साळुंके या मान्यवरांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.

उपशिक्षक डी.बी. भारती यांच्या संकल्पनेतून इ.9 वी व 10 वी वगाॅतील विदयार्थ्यांनी हर घर तिरंगा मोहिमेत प्रत्येक घरातील नागरिकांनी ध्वजारोहण कसे, कधी करावे ? तिरंग्याचा सन्मान कसा राखावा ? ध्वज सुरक्षितता कशी असावी ? यावर आधारित पथनाट्याचे सादरीकरण विखरण गावातील विविध चौकात सादर करण्यात आले.

विविध घोषवाक्य, देशभक्तीपर गीतांच्या गजरात रॅलीचे गावात आयोजन करण्यात आले.कार्यक्रम यशस्वितेसाठी विद्यालयातील शिक्षक के.पी. देवरे, एम.डी. नेरकर, वाय.डी.बागुल, एस.एच.गायकवाड, शिक्षकेत्तर कर्मचारी आर.एम.पाटील, एस. जी.पाटील, एम.आर. भामरे यांनी परिश्रम घेतले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.