Press "Enter" to skip to content

शिवसेना पेण तालुकाप्रमुख जगदीश ठाकुर यांची नियुक्ती

सिटी बेल ∆ पेण ∆ वार्ताहर ∆

मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातल्या शिवसेनेमध्ये अनेक वाद निर्माण झाले आहेत त्यातच रायगड जिल्ह्यातील अलिबाग मुरुडचे आमदार महेंद्र दळवी यांनी ही शिंदे गटाला पाठिंबा दर्शविला असल्याने चार दिवसापूर्वी पेणचे तालुकाप्रमुख तुषार मानकावले यांनीही शिंदे गटाला पाठिंबा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तात्काळ पेण तालुकाप्रमुख म्हणून जगदीश ठाकुर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी मंत्री अनंत गीते, जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, सहसंपर्कप्रमुख किशोर जैन या सर्व नेत्यांनी माझ्यावर पेण तालुकाप्रमुख म्हणून जी जबाबदारी टाकली आहे. ती यशस्वीपणे पेलणार असून तालुक्यामध्ये पक्ष संघटना वाढविण्याचे काम आम्ही सर्व निष्ठावंत शिवसैनिक करणार आहोत असे यावेळी नवनिर्वाचित तालुकाप्रमुख जगदीश ठाकुर यांची सांगितले.

यावेळी जिल्ह्यासह तालुक्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी जगदीश ठाकुर यांचे अभिनंदन केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.