Press "Enter" to skip to content

उरण पनवेल मधील मनसे पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

सिटी बेल ∆ उरण ∆ विठ्ठल ममताबादे ∆

मनसेच्या कार्याचा, विचारांचा तळागाळात प्रचार व प्रसार व्हावा या दृष्टी कोणातून मनसेचे संस्थापक राज ठाकरे यांच्या आदेशाने उरण व पनवेल मधील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

मंगेश जनार्धन वाजेकर,राकेश देवयानी भोईर,दिपक धनाजी पाटील,राजेंद्र गोपीनाथ माळी यांची उरण उपतालुका अध्यक्ष पदी तर कैलास माळी, निर्दोष गोंधळी,सुजित सोनावणे,राकेश भोईर,दिपक पाटील, नरेंद्र मोकल यांची पनवेल उपतालुका अध्यक्ष पदी नेमणूक करण्यात आली.तसेच उरण तालुक्यातील विभाग अध्यक्ष पदी संदीप ठाकूर,निशांत ठाकूर,दिपक सुतार,कृष्णा ठाकूर,अनिल गावंड, महेश पाटील,अमर ठाकूर यांची नेमणूक करण्यात आली आहे.

सदर नियुक्त्या मनसेचे संस्थापक राज ठाकरे यांच्या आदेशाने मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी उद्घाटन केलेल्या उरण मधील मनसेच्या संपर्क कार्यालयात रायगड जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर यांनी केल्या.यावेळी रायगड जिल्हा सचिव केसरीनाथ पाटील, उपजिल्हाध्यक्ष दीपक कांबळी,प्रवीण दळवी,तालुका अध्यक्ष रामदास पाटील (पनवेल) ,सत्यवान भगत (प्रभारी तालुका अध्यक्ष उरण ) हे उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.