Press "Enter" to skip to content

पेण येथे शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना कार्यालयाचे उद्घाटन

शिवसेना ही कधीही न संपणारी संघटना आहे — उदय दळवी

सिटी बेल ∆ पेण ∆ वार्ताहर ∆

मागच्या काही दिवसांपासून शिवसेनेमध्ये फुट पाडण्याचे कटकारस्थान भाजपचे सुरू मात्र शिवसेना ही कधीही न संपणारी संघटना असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र वाहतूक सेनेचे अध्यक्ष उदय दळवी यांनी पेण येथे केले.

शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना या कार्यालयाचे उद्घाटन दि.२३ जुलै रोजी अध्यक्ष उदय दळवी, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, सहसंपर्क प्रमुख किशोर जैन यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी उपजिल्हाप्रमुख अविनाश म्हात्रे, वाहतूक सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष श्रीतेज कदम, जिल्हाध्यक्ष अच्युत पाटील, उपजिल्हाध्यक्ष उत्तम वाघ, राजू पाटील, नरेश सोनवणे, नरेश गावंड, महिला आघाडीच्या दीपश्री पोटफोडे, राजाराम पाटील, अलिबाग तालुकाप्रमुख महेश गुरव, प्रदीप वर्तक, जगदीश ठाकुर आदिंसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, महामार्गालगत असणाऱ्या या कार्यालयामधून नागरीकांच्या समस्या सुटल्या पाहीजेत कारण जरी हे कार्यालय वाहतूक सेनेचे असले तरी या पुढे शिवसेना हे नांव जोडले आहे त्यामुळे शिवसेना प्रमुखाचे स्वप्न साकार करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकसंघ राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.तर पेण मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आपली मते जास्त आहेत त्यामुळे आपल्या ताकतीवर युतीमधून रविशेठ पाटील हे निवडून आले आहेत.येणा-या काळात या मतदारसंघावर शिवसेनाचा झेंडा फडकाविण्यासाठी तयार रहा असे जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे व सहसंपर्कप्रमुख किशोर जैन यांनी यावेळी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.