सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆
वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सरपंच ताई पवार यांना अपात्र ठरवून पदावरुन हटविण्यात आल्याने सरपंचपद रिक्त होते. ग्रामपंचायतीच्या सरपंच बडतर्फ केले गेल्यामुळे त्या रिक्त असलेल्या जागी उपसरपंच म्हणून काम करीत असलेल्या माधुरी भगवान जांभळे यांची प्रभारी सरपंच म्हणून निवड करण्यात आली.
यावेळी वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत सदस्य व ग्रामविकास अधिकारी सचिन कुराडे उपस्थित होते.प्रभारी सरपंचपदी माधुरी भगवान जांभळे यांची निवड झाल्याने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी त्यांचे आभार मानून शुभेच्छा दिल्या.
Be First to Comment