Press "Enter" to skip to content

रसायनीत काॅग्रेस आयकडून दोघा माजी आमदारांचा पुण्यस्मरण कार्यक्रम

सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆

माजी आमदार कै माणिकराव जगताप (आबा) व माजी आमदार कै मधुकरशेठ ठाकुर (पप्पा) यांचा प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम मोहोपाडा येथील अशोक मुंढे यांच्या हाॅलवर पार पडला.

हा कार्यक्रम खालापुर तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्याच्यावतीने रमेश बाळाराम म्हात्रे(नाना) यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमास नाना म्हात्रे यांनी श्रध्दांजलीपर विचार व्यक्त केले तसेच अशोकशेठ मुंढे, दिपाली म्हात्रे ,प्रशांत गायकवाड यांनी ही मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करून माजी आमदार कै.माणिकराव जगताप व माजी आमदार कै.मधूकरशेठ ठाकूर यांना आदरांजली वाहीली.

सदर कार्यक्रमास अशोकशेठ मुंढे (रा जि काॅ ऊपाध्यक्ष), नाना म्हात्रे (जेष्ठ नेते), प्रशांत गायकवाड (चिटणीस म प्र यु काॅ), दिपाली म्हात्रे (उपाध्यक्ष रा जि काॅ), अर्जुन जोडे(माजी अध्यक्ष पं स ), सागर सुखदरे (रा जि यु काॅ), धनाजी जांभळे (ऊपसरपंच चांभार्ली), उपाध्यक्ष सोपानराव गोरे ,नाना पाटील सर, तुकाराम महाराज लोभी,देवानंद जगताप प्रल्हाद माळी ,शंकर पाटील, अशीष जाधव,प्रतीकेश म्हात्रे,राजेश कांबळे इतर अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ह्या सर्वानी दोन मिनीटे शांत उभे राहुन ह्या दोन्ही नेत्यांना भावपुर्ण श्रध्दांजली वाहिली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.