शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना पनवेल विधानसभा-१८८ मधील शिवसेना पदाधिकारी, महीला आघाडी, युवासेना व युवतीसेना पदाधिकाऱ्यांनी आम्ही सदैव आपल्या सोबत असल्याची दिली ग्वाही
सिटी बेल ∆ पनवेल ∆ वार्ताहर ∆
शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली पनवेल विधानसभा-१८८ मधील शिवसेना पदाधिकारी, महीला आघाडी, युवासेना व युवतीसेना पदाधिकारी यांनी मातोश्री निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली व आम्ही सदैव तुमच्या सोबत असल्याची ग्वाही दिली.
या प्रसंगी पनवेल विधानसभेच्या वतीने सर्व शिवसैनिक यांनी सदैव मातोश्री व मा. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या सोबत आहोत असा निर्धार केला. या वेळी पनवेल विधानसभा क्षेत्रातील सर्व पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना व युवतीसेना आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Be First to Comment