Press "Enter" to skip to content

अमित ठाकरे यांच्याहस्ते बारवई बसथांब्याचे लोकार्पण

सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांचे बारवई थांब्यावर आगमन होताच मनसेचे मा.तालुकाध्यक्ष अविनाश पडवल यांच्यावतीने जोरदार स्वागत करण्यात आले.

यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली यानंतर सौ.कविता पडवळ यांच्याकडून औक्षण करण्यात आले.यानंतर मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्याहस्ते बारवई बसथांब्याचे लोकार्पण करण्यात आले.यावेळी मनसैनिकांनी घोषणाबाजी केली.

दरम्यान बारवई ग्रामस्थांना पनवेलकडे जाण्यासाठी बारवई थांबा रस्त्यावर पावसाळ्यात भिजत उभे राहून वाहनांची वाट पाहावी लागत होती. सदर समस्या मनसेचे मा.तालुकाध्यक्ष अविनाश पडवळ यांनी लक्षात घेऊन स्वखर्चाने बारवई बसथांबा उभारला. याच बसथांब्याचे लोकार्पण मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्याहस्ते करण्यात आले.

यावेळी मनसेचे उपाध्यक्ष महेश जाधव, जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, उपजिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, तालुका अध्यक्ष रामदास पाटील,बारवई ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.मनसेचे मा.तालुकाध्यक्ष अविनाश पडवळ यांनी बारवई बसथांबा उभारल्याने त्यांचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.