सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆
मोहोपाडा येथील कै.सुधाकर मधुसूदन परांजपे यांचे वयाच्या ६४ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता पसरताच अंत्यसंस्कारासाठी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित झाला.त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी श्रीमती साधना सुधाकर परांजपे. (मनिषा) आणि त्यांचा मुलगा कु.अवधूत सुधाकर परांजपे हे आहेत.
तसेच ते मोहोपाडा चांभार्ली गुळसुंदा आपटा ह्या पंचक्रोशीत गणेश जयंती,रामनवमी,हनुमान जयंती, श्रीकृष्ण जयंती या उत्सवांमधे मंदिरात किर्तनाला हार्मोनियम (पेटी) वादनाची साथसंगत करत असे. तसेच घरोघरी जाऊन अगरबत्ती,कापूर,अत्तर,सेंट ई. गोष्टी जाऊन विकायचे.ते संपूर्ण परिसरात परांजपे काका म्हणुन परिचित होते. त्यांचा मुलगा आपल्या परिसरात पौरोहित्य (भटजी) चे काम करतो.त्यांचा दशक्रिया विधी शुक्रवार दि. १ जूलै २०२२ रोजी गुळसुंदा येथे होणार आहे.तर उत्तरकार्य सोमवार ४ जूलै २०२२ रोजी राहत्या घरी होणार आहे.
Be First to Comment