सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆
कै जगन्नाथ विणू दाभणे याचे वयाच्या ८० व्यावर्षी राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता पसरताच अंत्यसंस्कारासाठी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.त्यांच्या पश्चात एक पत्नी, दोन मुले ,दोन मुली ,दोन सुना, नातू ,नाती, नातसून असा परिवार आहे.
कै.जगन्नाथ दाभणे यांनी पन्नास वर्षांपूर्वी आपल्या मालकीच्या माळरानावर आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी रताळ्याचे पीक घेतले.ही रताळी आपले मित्र परिवार चेंडू जांभळे यांच्या सहकार्याने बैलगाडीत रताळी पोती भरून रसायनीतील गावोगावी विकण्याचा धंदा करत होते. ह्या धंद्यातून येणारे इन्कम तुटपुंजी असल्यामुळे जगन्नाथ दाभणे घर बांधकाम व्यवसायाकडे वळले त्यातून येणाऱ्या इन्कम मधून ते आ आपल्या संसाराचा गाडा चालवत असत .त्यांचा स्वभाव मनमिळावू प्रेमळ हास्य दुसऱ्याचे दुःख कसे कमी होईल, याकडे त्यांचे प्राधान्य असत त्यांच्या जाण्याने गावावर शोककळा पसरली.
त्यांचा दशक्रिया विधी शनिवार दिनांक 4/06/22 रोजी श्री क्षेत्र नीलकंठेश्वर मंदिर कशेळे येथे झाला आहे.सोमवार दिनांक 06/6/22 रोजी सायंकाली 7 ते 9 या वेळेत ह भ प हरिचंद्र महाराज उक्रुल यांचे सुश्राव्य असे कीर्तन होणार आहे .उत्तर कार्य मंगळवार दिनांक 7/06/22 रोजी राहत्या घरी होणार आहे. यानिमित्ताने मंगळवारी7/06/22 रोजी ह भ प राजाराम शेळके यांचे प्रवचन होणार आहे.
Be First to Comment