सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆
रसायनी पाताळगंगा परिसरातील कराडे बुद्रुक जांभिवली ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष व इंदेमित्सू कंपनीच्या कोअर कमिटीचे अध्यक्ष रामचंद्र भाऊ पाटील यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मित निधन झाले.
मृत्युसमयी त्यांचे वय ६८ वर्षांचे होते.ते पाताळगंगा येथील रिलायन्स कंपनीतील युटीलिटी प्लांटमध्ये मेंटेनन्स ऑपरेटर या पदावर १९८४ ते २००८ या काळात कार्यरत होते.सर्व सामजिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा नेहमी सहभाग असायचा .त्यांच्या आकस्मित निधनाने सर्व समाजामध्ये शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी , मुलगी- जावई, दोन मुले , सूना – नातवंडे असा परिवार आहे. त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव दिपक रामचंद्र पाटील हे इंदेमित्सू कंपनीत ऑपरेशन डिपार्टमेंट मध्ये ऑफिसर या पदावर कार्यरत आहेत. व धाकटे चिरंजीव डॉ. जितेंद्र रामचंद्र पाटील हे सिध्देश्वरी कॉर्नर रसायनी पाताळगंगा येथे त्यांच्या डॉ. पाटील हॉस्पिटल येथे कार्यरत आहेत.








Be First to Comment