रिलायन्स कुहिरे गेट समोर भारतीय श्रमिक शक्ती संघाच्या नामफलकाचे आ. दळवी यांच्या हस्ते अनावरण
सिटी बेल ∆ नागोठणे ∆ महेश पवार ∆
माझ्या राजकीय कारकिर्दीला कामगार युनियनच्या माध्यमातूनच सुरवात झाली. मी ११ वर्ष आरसीएफ कंपनीची कामगार युनियन हाताळली. मी कामगारांचे हित लक्षात ठेऊन काम केल्यामुळे मला सर्वसामान्य जनतेने मला आमदार केले. कुठल्याही कामगार युनियनने कामगारांचे हित लक्षात ठेऊनच काम केले पाहिजे. नागोठणे रिलायन्स कंपनीत नव्याने स्थापन झालेली भारतीय श्रमिक शक्ती संघ ही युनियन कामगारांचे हित लक्षात ठेऊन काम करेल असा मला विश्वास असुन माझा या कामगार युनियनला पूर्ण पाठिंबा आहे.
आज तुमच्या सोबत किती कामगार आहेत याचा विचार न करता कामगारांच्या न्याय हक्का साठी लढा द्या व नागोठणे रिलायन्स कंपनीतील कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडवा असे आवाहन करून कंपनी व्यवस्थापनाने कंपनीच्या हिताबरोबर कामगारांचे हितही पहावे तसेच रिलायन्स कंपनीने स्थानिकांना सामाहून घेतलेच पाहिजे अन्यथा कंपनी व्यवस्थापनाला कायदेशीर मार्गाने योग्य तो धडा दिल्याशिवाय शांत बसणार नाही असा कडक इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख तथा अलिबाग मुरुड मतदार संघांचे आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी रिलायन्स कंपनी व्यवस्थापनाला दिला.
दरम्यान आमदार दळवी यांचे आगमन झाल्यानंतर कामगार एकजुटीचा विजय असो, महेंद्रशेठ आगे बढो हम तुम्हारे साथ है, दिपकभाई आगे बढो हम तुम्हारे साथ है, कोण आला रे कोण आला कामगारांचा नेता आला, जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव आदी घोषणांनी फटाकांच्या आतषबाजीत संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
नागोठणे येथील रिलायन्स कमानीच्या कुहिरे गेट समोर सोमवार दि. १६ मे रोजी सायंकाळी ५ वाजता भारतीय श्रमिक शक्ती संघाच्या नामफलकाचे अनावरण आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या हस्ते संपन्न झाले त्यावेळी उपस्थित कामगारांना मार्गदर्शन करताना आ. दळवी बोलत होते. यावेळी भारतीय श्रमिक शक्ती संघ युनियनचे अध्यक्ष अॅड. नितीन शिवकर, कार्याध्यक्ष व कामगार नेते दिपकभाई रानवडे, सरचिटणीस जिम्मी डे, ठाणे-पालघर कार्याध्यक्ष उपेंद्र पाटील, शिवसेना अलिबाग तालुका प्रमुख राजाभाई केणी, राजिपचे माजी उपाध्यक्ष संजय जोशी, युनियनचे नागोठणे युनिट अध्यक्ष निलेश नाईक, कार्याध्यक्ष अशोक भोय, जनरल सेक्रेटरी प्रमोद मोरे, उपाध्यक्ष प्रविण दबडे, चंद्रकांत अडसुळे, मनोज पेढवी, किशोर शिर्के, गणपत खाडे, खजिनदार मोहन भोय, युनिट सचिव संजय काकडे, सुरेश गायकर, शांताराम भोई, महेश धोत्रे, सहसचिव पंडित तुपकर, विनोद गोरे, दिनेश शिर्के, सुरेश कुथे कार्यकारिणी सदस्य कृष्णा बडे, राजेश रोकडे, संजय गायकवाड, महादू लाडगे, निलेश म्हात्रे, महिला कामगार नेत्या भारती सिंगासने, अनुजा म्हात्रे, संदेश अडसुळे, विठोबा कुथे, अझिम बेणसेकर, सल्लागार समिती मधील सुभाष खराडे, मारुती दांडेकर, अॅड. महेश पवार, कामगार नेते उद्धव कुथे, अरुण कुथे, गणपत खाडे, शिवसेनेचे हिराजी चोगले, शिवसेना महिला आघाडी शिहू विभाग प्रमुख सरिता पाटील, मधुकर वाळंज, राजेंद्र वाळंज आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व कामगार बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कामगार नेते चंद्रकांत अडसुळे यांनी केले.
भारतीय श्रमिक शक्ती संघाची स्थापना का करण्यात आली याची माहिती देऊन कामगार नेते दिपकभाई रानवडे म्हणाले की, आम्ही आंदोलन करणारी मंडळी असून आमची धर्म जात एकच आहे ती म्हणजे कामगार. रिलायन्स कंपनीतील चार फोरम पैकी तीन फोरम आमच्या सोबत आहेत. आता उरली फक्त एक रम. कंपनी चालु राहिली पाहिजे. मालक जगला तर कामगार जगेल या तत्वाने आम्ही वागत आलेलो आहोत. कंपनी व्यवस्थापनाने कामगारांना सन्मान द्यावा तसेच त्यांच्याशी व्यवस्थित वागा. जर आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न केला तर याद राखा असा इशाराही यावेळी दिपकभाई रानवडे यांनी कंपनी व्यवस्थापनाला दिला.
त्यानंतर कंपनीच्या निवासी संकुलातील इस्टेट आॅफिस मध्ये संपन्न झालेल्या बैठकीत रिलायन्स व्यवस्थापनाकडून वरिष्ठ अधिकारी विनय किर्लोस्कर व श्रिकांत गोडबोले यांनी आ. महेंद्रशेठ दळवी व युनियनच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.
यावेळी भारतीय श्रमिक शक्ती संघाकडून रिलायन्स कंपनीच्या नागोठणे युनिट मध्ये निवृत्त झालेल्या कामगारांच्या जागी नवीन कामगार भरती होत नसल्यामुळे कामगारांवर कामाचा अतिरिक्त त्रास येत असल्याने कंपनी व्यवस्थापनाने नवीन कामगार भरती करावी तसेच ही भरती करतांना आय.टी.आय., डिप्लोमा, डिग्री इंजिनिअरींग, बी.एससी झालेल्या स्थानिक बेरोजगारांना नोकरीत प्रथम प्राधान्य द्यावे अशा प्रातिनिधीक स्वरूपाच्या मागण्या सादर करण्यात आल्या. भारतीय श्रमिक शक्ती संघ युनियनला व्यवस्थापनाकडून नेहमी सहकार्याची भूमिका राहिल असे यावेळी विनय किर्लोस्कर यांनी आश्वासित केले.
Be First to Comment