Press "Enter" to skip to content

पुणे -भोसरी येथे सोहळा संपन्न

मनोज पाटील यांना राज्यस्तरीय सेवासन्मान आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

सिटी बेल ∆ उरण ∆ विठ्ठल ममताबादे ∆

महाराष्ट्र शिक्षक पॅनल च्या वतीने राज्यातील गुणवंत शिक्षकांना देण्यात येणारा राज्यस्तरीय “सेवासन्मान आदर्श शिक्षक पुरस्कार 2022” हा पुरस्कार उरण तालुक्यातील पाणदिवे गावातील सुपुत्र सध्या सु़धागड एज्युकेशन सोसायटीच्या कळंबोली येथील सु़धागड विद्यासंकुलात अध्यापनाचे कार्य करत असणारे शिक्षक मनोज पाटील यांना प्रदान करण्यात आला.सदर पुरस्कार पुणे -भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात सिने अभिनेत्री डाॅ.निशिगंधा वाड ,शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

मनोज पाटील यांनी यांनी सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या पेण तालुक्यातील रावे येथील माध्यमिक शाळेत 1996 मध्ये आपल्या अध्यापण कार्याला सुरूवात केली होती.अध्यापण कार्याबरोबरच तेथे त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्नशील राहीले आहेत.जानेवारी 2014 मध्ये ते सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या कळंबोली येथील सुधागड विद्यासंकुलात कार्यास सुरवात केली. तेथेही ते शैक्षणिक कार्याबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्नशिल आहेत.

शैक्षणिक कार्याबरोबरच त्यांनी आपल्या महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान पाणदिवे या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून सामाजिक , शैक्षणिक, आरोग्य,क्रीडा व पर्यावरण क्षेत्रात भरीव कार्य केले आहे.आज पर्यंत त्यांना भारत सरकार चा युवा पुरस्कार ,रायगड जिल्हा परिषदचा आदर्श शिक्षक पुरस्कार ,रायगड भूषण पुरस्कारासह अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत .सदर पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल शाळेचे प्राचार्य राजेंद्र पालवे ,उपप्राचार्या सरोज पाटील , महाराष्ट्र शिक्षक पॅनल रायगड विभाग प्रमुख सुरेश शिंदे,शिक्षक कर्मचारी वर्ग, चाहत्यांनी शिक्षक मनोज पाटील यांचे अभिनंदन केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.