समाजप्रबोधनकार ह.भ.प.भाऊमहाराज निकम यांचा सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा उत्साहात संपन्न
सिटी बेल • खांब-रोहे • नंदकुमार मरवडे •
रोहे तालुक्यातील धामणसई या गावचे प्रतिष्ठित नागरिक तथा जेष्ठ वारकरी व समाजप्रबोधनकार भाऊमहाराज निकम व त्यांच्या सौभाग्यवती यांचा सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला.
ह.भ.प.निकममहाराज यांचा परिवार,ग्रामस्थ व धामणसई पंचक्रोशी यांच्या संकल्पनेतून संपन्न झालेल्या या सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते विजय मोरे,अप्पा देशमुख,जेष्ठ किर्तनकार रायगड भूषण पुरूषोत्तम महाराज पाटील,मांडलुस्कर महाराज,नारायण महाराज दहिंबेकर, नित्यानंद महाराज मांडवकर,रघुनाथ भोकटे,महादेव सानप,दिनेश कडव,वैभव खांडेकर, रघुनाथ करंजे,मारूती तुपकर, महेश तुपकर, रविना मालुसरे आदी मान्यवरांसह संपूर्ण रोहे तालुक्यातील वारकरी सांप्रदायाचे भाविक भक्त व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अतिशय प्रमाणिकपणे आपला शेती व्यवसाय व शेती पूरक व्यवसाय सांभाळून तसेच संपूर्ण जीवनभर सांप्रदायाची प्रामाणिक सेवा करून सांप्रदायाचे विचार घराघरांत रूजवून आपला परिवार व समाजासाठी बहुमोल योगदान देऊन कार्यरत असणारे भाऊमहाराज निकम
आयुष्याला ८६ वर्षे पूर्ण झाल्याने त्यांच्याप्रति क्रुतज्ञता भाव व्यक्त करण्यासाठी समस्त निकम परिवार व आप्तस्वकीय सगेसोयरे यांनी तसेच धामणसई पंचक्रोशी यांनी आयोजित केलेल्या या सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्यातंर्गत प्रकारचे धार्मिक व अध्यात्मिक कार्यक्रम तसेच धार्मिक पूजाविधी तसेच भाऊमहाराज व त्यांच्या सौभाग्यवती यांना शेकडो
दिव्यांची ओवाळणी करून तसेच कार्यक्रमस्थळी दिवे व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसेच भाऊमहाराज यांची ग्रंथतुला व मिष्टान्नतुला करण्यात आली.तसेच श्री. विठोबा पवार यांची साखरेतून व रेणूबाई यांची गुळातून तुला करण्यात आली.धामणसई परिसरात पहिल्यांदाच अशाप्रकारचा कार्यक्रम संपन्न झाल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले.तर भाऊमहाराज व त्यांच्या सौभाग्यवती यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे आप्तस्वकीय, मित्र परिवार व सगेसोयरे तसेच ग्रामस्थ मंडळ व पंचक्रोशीतील भाविकांसह तालुक्यातील भाविकभक्त यांनी अक्षरक्ष: फार मोठी गर्दी केली होती.
Be First to Comment