सिटी बेल • कर्जत • संजय गायकवाड •
कर्जत तालुक्यातील नेवाळी येथील हनुमान मंदिराचा गाभारा वडील कै मोरेश्वर जनार्दन बेलोसे यांच्या स्मरणार्थ केतन मोरेश्वर बेलोसे व कुटुंबीय यांनी स्वखर्चाने बांधला या गाभाऱ्याचा लोकार्पण केतन बेलोसे यांच्या हस्ते करण्यात आला.
नेवाळी येथील प्राचीन हनुमान मंदिर गाभाऱ्याचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित होते, सदरील गाभाऱ्याचे काम व्हावे ही ग्रामस्थांची मनापासून इच्छा होती. गावातील ग्रामस्थांनी हनुमान मंदिर गाभा-याचे काम करण्यासंदर्भात केतन बेलोसे यांच्याकडे मागणी केली. केतन बेलोसे यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ हनुमान मंदिर गाभा-याचे काम करण्याच सांगितले.


सदरील काम हनुमान मंदिर जयंतीच्या निमित्ताने करण्यात आले, हनुमान मंदिर गाभाऱ्याचे अतिशय देखणे झालेले काम पाहून गावातील ग्रामस्थांकडून व परिसरातील नागरिकांकडून कामाचे कैतुक केले आहे. या कामाचे हनुमान जयंतीचे औचित्य साधून केतन बेलोसे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न झाले, याप्रसंगी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.








Be First to Comment