Press "Enter" to skip to content

ओल्डमर्स्क च्या कामगारांच्या पगारवाढीचा करार

सि. एफ. एस. मधिल कामगारांसाठी कामगारनेते महेंद्र घरत बनले “मसीहा”

सिटी बेल • उरण •

एकीकडे DPD धोरणामुळे कामगार कपात होत असतांना कामगार नेते महेंद्र घरत हे कामगारांची रोजीरोटी चालू ठेऊन पगारवाढीचे करार करत आहेत. आज ओल्डमर्स्क (APMT) मधील कामगारांच्या पगारवाढीचा करार न्यू मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटनेच्या पनवेल कार्यालयात करण्यात आला.

काही वर्षापूर्वी ९९ कामगार कपात केलेल्या APMT या CFS मध्ये पुन्हा कामगार कपातीचे वारे वाहू लागले होते. त्यावेळी मर्स्कच्या कामगारांनी कामगारनेते महेंद्र घरत यांचे नेतृत्व स्विकारले. कामगार नेते महेंद्र घरत यांनी चाणक्य बुद्धीने कामगार कपात तर थांबविलीच परंतु कामगारांना ७,३००/- रुपयांची पगारवाढ करण्यात आली. तसेच सध्या बंद होऊ घातलेल्या पंजाब कॉनवेअर मधील कामगारांना त्यांची कायदेशीर देणी मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याबरोबर पत्रव्यवहार केला. पंजाब मुख्यमंत्री कार्यालयातून नवीन कंत्राटदारास वर्क ऑर्डर देऊन लवकरात लवकर कंपनी चालू करण्याचे पत्र महेंद्र घरत यांना आले आहे. हिंद टर्मिनल मधील सर्व कामगार महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली एकवटून व्यवस्थापनेबरोबर लढा देत आहेत. हिंद टर्मिनल मधील कामगारांना न्याय मिळवून देऊ असे महेंद्र घरत यांनी कामगारांना आश्वासित केले आहे.

हिंद टर्मिनल सुरु राहावी यासाठी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याबरोबर बैठकीसाठी प्रयत्न सुरु आहेत. अशा प्रकारे कामगार नेते महेंद्र घरत हे लॉजिस्टीक्स विभागाच्या कामगारांना आपले मसीहा वाटत आहेत.

आज पनवेल कार्यालयात मर्स्क (APMT) मधील कामगारांसाठी झालेल्या पगारवाढीच्या करारनाम्यानुसार कामगारांना ७,३००/- रुपये पगारवाढ, दरवर्षी १,५००/- रुपये बोनसमध्ये वाढ, ३ लाख रुपयांची मेडिक्लेम पॉलिसी, महागाई भत्ता, ३ लाख रुपयांची टर्म इन्सुरन्स पॉलिसी देण्याचे मान्य करण्यात आले आहे. फरकापोटी प्रत्येक कामगारांना दिड लाख रुपये मिळणार आहेत त्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या करारनाम्याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष महेंद्र घरत, वैभव पाटील (सरचिटणीस), प्रेमनाथ ठाकूर (संघटक), योगेश रसाळ (संघटक), व्यवस्थापनातर्फे, योगेश ठाकूर (APMT मॅनेजर), चिराग जागड (फ्युचर्झ डायरेक्टर), कामगारांतर्फे, प्रशांत पाटील, भरत ठाकूर, नरेश भोईर, दत्तात्रेय केदारी, यशवंत पाटील, शरद तांडेल, भालचंद्र तांडेल, बाळकृष्ण पाटील आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.