Press "Enter" to skip to content

आईच्या यात्रेमध्ये लावला जातो गळ

आदर्शगाव भातसई येथिल श्री महादेवी मातेचा यावर्षी १५ तारखेला पालखी व १६ तारखेला यात्राउत्सव

सिटी बेल • रोहा • समीर बामुगडे •

हाकेला धावणारी नवसाला पावणारी आदर्शगाव भातसई येथिल श्री महादेवी मातेचा पालखी व यात्रा उत्सव शुक्रवार दिनांक १५/४/२०२२रोजी दुपरी १२वाजता पालखी मिरवणुकीला भातसई गावातुन येशीच्या मंदिरातुन सुरुवात होणार आहे. पालखी नतंर झोलांबे कोपरे या गावात जाते.त्यानंतर पालखी झोलांबे गाव ,लक्ष्मीनगर येथे फिरवून रात्री७वाजता आदर्शगाव भातसई गावात घरोघरी भक्तीमय वातावर्नात फिरून महादेवी मंदिरात जाते.

दुस-या दिवशी शनिवार१६/४/२०२२रोजी महादेवी मातेचा यात्राउत्सवाला सुरुवात होते.सकाळ पासुनभक्त नवस घेऊन मंदिरात वाजत गाजत येत आसतात. सर्व रायगड जिल्ह्यातील व बाहेरून जिल्यातील भक्ताचे जनसागर महादेवी आईच्या यात्रेमध्ये सहभागी होतात. यात्रेचा मुख्य कार्यक्रम गळ लावणे. यावर्षीचा गळ सायंकाळी ५-३०वाजता सुरुवात होणार आहे. एकूण सहा भक्ताना गळ लावले जातात. त्यांपैकी एक भक्तांचा वरचा गळ लाटेला लटकवून एक फेरी फिरवली जाते.या उत्सवासाठी निडी,कोपरे,झोळांबे लक्ष्मीनगर,वरवडे पाले तर्फे अष्टमी, आरे बुंद्रुक, शेजारी गांवातील मानाच्या काट्या येतात.

या पालखी व यात्रा उत्सवासाठी भाविकांनी उपस्थीत राहावे आसे आग्रहच निमंत्रण आदर्श गाव भातसई, यात्रा उत्सव कमेटीने केली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.