देवाची भक्ती ही सतत वाहणाऱ्या पाण्याच्या झऱ्या प्रमाणे करा :- ह.भ.प. दळवी महाराज गुरुजी
सिटी बेल • गोवे-कोलाड • विश्वास निकम •
खरी भक्ती देवा पर्यंत पोहचायची असेल ती भक्ती जाणते पणांनी करा ज्याच्या भक्तीत सातत्य असते.तीच भक्ती देवापर्यँत पोहचते. ज्या प्रमाणे पाण्याचा झरा कधीही अटत नाही. डपके आटेल पण पाण्याचा झरा लागलेली विहीर कधीही आटत नाही त्या पाण्याच्या झऱ्यात सातत्य आहे.याप्रमाणे भक्ती मध्ये रममान झाले पाहिजे असे मत धामणसई पंचक्रोशी येथील आयोजित किर्तन सेवेत ह.भ.प दळवी महाराज गुरुजी यांनी जाणे भक्तीचा जिव्हाळा ।तोचि दैवाचा पुतळा ॥१॥आणीक नये माझ्या मना ।हो का पंडित शाहाणा ॥ध्रु.॥नामरूपीं जडलें चित्त ।
त्याचा दास मी अंकित ॥२॥तुका म्हणे नवविध ।
भक्ती जाणे तोचि शुद्ध ॥३॥या जगद गुरु तुकाराम यांच्या अभंगाच्या आधारे स्पष्ट केले.
खरोखरच ज्याची भक्ती अतिशय जिव्हाळ्याचे आहे तो दैवाचा पुतळाच आहे.त्याच्या वाचून इतर कोणी शहाणा पंडित असेल,तरी ते मोठे दैववान आहेत असे माझ्या मनाला पटत नाही.हरीच्या नामारुपाच्या ठिकाणी ज्याचे मन जडले आहे,त्याच्या आधीन असा मी त्याचा दासच आहे. तुकाराम महाराज म्हणतात जो श्रवण,कीर्तन, मनन इत्यादी नऊप्रकारची भक्ती करणे जाणतो ,तोच मनुष्य खरा शुद्ध मानावा.
यावेळी मृदूंग सम्राट सुनिल मेस्त्री सर पोलादपूर,गायनाचार्य ह.भ.प.प्रणित सुतार,नरेश दळवी, दिपक दळवी,अविनाश भोसले,रघुनाथ भोकटे, नाना देशमुख, दिलीप कदम, महादेव सानप, महादेव महाबळे, प्रदीप महाबळे, नारायण लोखंडे, महेश तूपकर, तसेच धामणसई पंचक्रोशीतील असंख्य नागरिक उपस्थित होते.
या वर्षी धामणसई येथील पंचक्रोशीचा ३९ वा वर्षे असून काही कारणांमुळे हा सप्ताह बंद होता तो सर्व पंचक्रोशीतील वारकरी संप्रदायातील नागरिक एकत्र येऊन सात वर्षांनी हा सप्ताह सुरु करून धामणसई येथे पुन्हा एकदा जणू पंढरीच उतरली असल्याचे दिसून येत असून हा सप्ताह यावर्षी दहा दिवस सुरु राहणार असून सर्व कार्यक्रम यसश्विकारण्यासाठी ग्रामस्थ मंडळ, तरुण वर्ग, समस्थ धामणसई महिला मंडळ अथक परिश्रम घेत आहेत.
Be First to Comment