Press "Enter" to skip to content

संजीव भांबोरे यांची नियुक्ती

जीवन आधार फौंडेशन रेस्क्यू फोर्स महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्षपदी संजीव भांबोरे

सिटी बेल • भंडारा • समीर बामुगडे •

भंडारा-येथून जवळच असलेल्या पहेला येथील सामाजिक कार्यकर्ते संजीव मुरारी भांबोरे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन जीवन आधार फौंडेशन रेस्क्यू फोर्सचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शंकर पोवार (कार्यक्षेत्र संपूर्ण भारत) यांनी जीवन आधार फाउंडेशन रेस्क्यू फोर्स महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्षपदी संजीव मुरारी भांबोरे यांची नियुक्ती केली आहे.

जीवन आधार फाउंडेशन रेस्क्यू फोर्स ही संस्था एनजीओ असून नुकतेच या संस्थेला स्कॉटलंड ने या संस्थेची दखल घेऊन आय.एस.ओ. मानांकने सन्मानित करण्यात आलेले आहे .

संजीव भांबोरे हे वयाच्या सोळाव्या वर्षापासूनच सामाजिक क्षेत्रात काम करीत असून त्यांचे जीवनच संघर्षमय आहे .त्यांनी आपल्या जीवनात अनेकांना न्याय मिळवून दिलेला आहे. महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज ,भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर ,छत्रपती शिवाजी महाराज , थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे, यांच्या विचारसरणीचे असून एखादी गोष्ट त्यांना पटली नाही तर स्पष्टपणे तोंडावर बोलणारी व्यक्ती आहेत. त्यांनी आपल्या जीवनात अनेक मोर्चे , आंदोलने , धरणे, उपोषणे , जेलभरो , आंदोलने केलीत. परिस्थिती नाजूक असतानासुद्धा परिस्थितीवर मात करून आपले सामाजिक कार्य आज पर्यंत त्यांनी सुरू ठेवले.

चहाच्या दुकानात नोकर राहून व डोक्यावर टेबल नेण्याचे काम सुद्धा केले आहे. ग्रामपंचायत मध्ये काही दिवस चपरासी म्हणून सुद्धा काम केले. त्यांनी महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार हमी योजनेवर सुद्धा त्यांनी दहा वर्षे काम केले. स्वस्त धान्य दुकानात नोकर राहून राशन वाटप सुरू करण्याचे सुद्धा काम केले .लस्सी विकण्याचे सुद्धा त्यांनी केले .पदवीधर अंशकालीन कर्मचारी म्हणून तलाठी कार्यालयात तीन वर्ष काम केले.

पहाडी वर जात असताना मजुरीचे पैसे जमा करून त्यांनी आमदारकी सुद्धा लढली. पहेला ,भंडारा ,नागपूर ,मुंबई दिल्ली पर्यंत अश्या अनेक प्रकारच्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. सुरुवातीला तीन-चार वर्षे 1999 ला लोकमत समाचार ला पत्रकारिता क्षेत्रात काम केले. त्यानंतरसुद्धा आजपर्यंत त्यांनी अनेक वर्तमानपत्रात पत्रकारिता क्षेत्रात काम करीत असून पत्रकारितेच्या माध्यमातून सार्वजनिक जीवनातील नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडण्याचे काम करीत आहेत . आपल्या लेखणीच्या माध्यमातून अनेकांना न्याय मिळवून दिलेला आहे.

आज त्यांच्याकडे सत्य पोलिस टाईम्स उपसंपादक, पी. टीव्ही .न्यूज चैनल चे सहसंपादक ,दैनिक दंडाधिकार भंडारा जिल्हा प्रतिनिधी, दैनिक शिल्पकार भंडारा जिल्हा प्रतिनिधी ,मुंबई वार्ताहर प्रतिनिधी, सांजवार्ता प्रतिनिधी अशा अनेक यूट्यूब चॅनल ,पोर्टर ,डिजिटल मीडिया प्रिंट मीडिया, क्षेत्रात सध्या कार्यरत असून ते प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस आहेत .तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नागपूर विभागाचे संपर्कप्रमुख सुद्धा आहेत. संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांना सुद्धा न्याय देण्याचे काम करीत आहेत .

आता त्यांच्यावर सामाजिक क्षेत्रातील जीवनआधार फाउंडेशन रेस्क्यू फोर्स कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य भारत देश पदाची जबाबदारी संस्थापक अध्यक्ष शंकर पोवार यांनी दिल्ली असून निश्चिततच या पदाला न्याय देतील यात शंका नाही. त्यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय सतीश लोखंडे औरंगाबाद अध्यक्ष जीवन आधार फाउंडेशन रेस्क्यू फोर्स ,संजय कदम अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ,प्रतिभा पवार अध्यक्ष महाराष्ट्र राज्य महिला विभाग ,युवराज पवार युवक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, डॉ .शोभा महाजन उपाध्यक्ष महिला आघाडी , तुषार पाटील सचिव महाराष्ट्र राज्य, अरविंद कांबळे सचिव राज युवक महाराष्ट्र राज्य यांना दिलेली आहे . एक महिन्या पूर्वी त्यांनी मला विदर्भाची अध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती परंतु माझे समाधानकारक कार्य पाहून त्यांनी मला महाराष्ट्र राज्याच्या कार्याध्यक्षपदी बढती दिली ज्यांना सामाजिक कार्याची आवड आहे त्यांनी त्वरित 70 66 37 04 89 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावे.

त्यांच्या नियुक्तीबद्दल प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी .टी .आंबेगावे, राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे डॉ. संजय चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते कुलदीप गंधे, सम्राट अशोक सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तुळशीराम गेडाम, सतीश सोमकुवर अध्यक्ष नागपूर विभाग मराठी साहित्य परिषद ,अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे नागपूर विभाग सरचिटणीस जयेंद्र चव्हाण, नीरजाताई आंबेरकर कोकण विभाग अध्यक्ष जीवन आधार फाउंडेशन, जीवन आधार फाउंडेशनचे अरविंद कांबळे, दैनिक दंडाधिकार चे मुख्य संपादक अर्जुन जाधव ,दैनिक शिल्पकार चे संपादक भूषण मोरे ,मुंबई वार्ताहर डिजिटल मीडिया चे मुख्य संपादक संजय लांडगे ,डिजिटल मीडियाचे सांजवार्ताचे मुख्य संपादक बिंबिसार सहारे, विदर्भ कार्याध्यक्ष नाशिक चवरे ,विदर्भ उपाध्यक्ष प्राध्यापक प्रेमानंद हटवार, विदर्भ महिला आघाडी अध्यक्ष उषा घोडेस्वार ,विदर्भ महिला सचिव शालू कृपाले ,चंद्रपूर जिल्हा सचिव प्रदीप वढे ,अहमदनगर जिल्हा अध्यक्ष प्रवीण महाजन ,नागपूर जिल्हा अध्यक्ष संघरत्न उके, विदर्भ युवती महिला अध्यक्ष सिखा पिपलेवार , विदर्भ कार्याध्यक्ष ज्योती उंदिरवाडे, विदर्भ संपर्क प्रमुख रोहिणी ठाकरे, विदर्भ महिला उपाध्यक्ष महिला आघाडी सुनिता तागवान, बापू वार्ता चे मुख्य संपादक देवेंद्र दमाहे ,सुरेश साठवणे, विदर्भ मीडिया प्रमुख चंद्रशेखर टेंभरे ,भंडारा जिल्हा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे भंडारा जिल्हा अध्यक्ष आशिश चेडगे ,देविका पाकीवार चंद्रपूर महिला आघाडी अध्यक्ष , वर्धा जिल्हा अध्यक्ष आशिष दुरूतकर ,नागेश बडोले ,प्रमोद कटरे
विदर्भ मीडिया प्रमुख ,लाखणी तालुका प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे अध्यक्ष संजय भोले या महाराष्ट्रातील चाहत्यांनी अभिनंदन केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.