साई संस्थान वहाळ येथील मंदिराचा 10 वर्धापन दिन उत्साहात साजरा
सिटी बेल • वहाळ • सुनिल ठाकूर •
दोन वर्ष कोरोनाच्या सावटाखाली साई मंदिराचा वर्धापन दिन व गुढी पाडवा अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला होता. या वर्षी कोरोनाचे सावट दूर झाल्याने व शासनाने निर्बंध शिथिल केल्याने साई देवस्थान साई नगर वहाळ श्री साईं बाबा मंदिराचा 10 वर्धापन दिन आज गुढी पाडवा दिवशी मोठ्या उत्साहात साजरा झाला.
आज सकाळी 6 वाजता जगनशेठ पाटील यांच्या हस्ते बाबांचे मंगल स्नान सकाळी 7 वाजता महाआरती व साईं बाबा अष्टोत्तर शत. नामावली जप वाचन सुयोग खरे, एकनाथ ठाकूर जगदीश पारिंगे, सदानंद कडु सौ राजेश्री मुंबईकर, सकाळी 8 ते 10 श्रीपति बाबा भजन मंड़ळ गव्हाण यांचे भजन, सकाळी 10 ते 12 ओमकार सांस्कृतिक भजन मंड़ळ उरण पूर्व विभाग यांचे भजन दुपारी 12 वाजता बाबांची मध्यान्ह आरती दुपारी 12, 30 वाजता. महाप्रसाद अन्नदाते देवस्थान चे अध्यक्ष रविशेठ पाटील, सायंकाळी 3 ते 5 राधा कृष्ण प्रासादिक भजन मंडळ कुंडेवहाल यांचे भजन सायंकाळी 5ते 6 भैरवी देवी आध्यात्मिक सेवा मंडळ केळवणे यांचे हरिपाठ सायंकाळी 6 वाजता बाबांची धुपारती सायंकाळी सात वाजता बाबांचा पालखी सोहळा यामध्ये संस्थापक कै, वामन बुवा कडु याचे रत्नेश्वरी साईं प्रेरना भजनाने टाल मृदुंगाच्या गजरात आतष बाजीने साईं पालखी च्या सोहळ्या ने सांगता झाली.
या कार्यक्रम दरम्यान रायगड भूषण मिळालेले निवेदक नितेश पंडित गायक डी आर ठाकूर, जितेंद्र म्हात्रे, एन आर आय पोलिस ठाणे च्या सौ कुंटे मैडम आदिना साईं देवस्थान च्या वतीने सन्मानित करण्यात आले.
आज गुढी पाडवा दिवशी मंदिरात दर्शना साठी मान्यवरांसह साई भक्तांची मांदियाळी दिसून येत होती. यामधे नारायण शशेठ घरत, हभप प्रल्हाद घरत, जि. प सदस्य रविंद्र पाटील, माजी जि प सदस्या सौ पार्वतीताई पाटील, जगनशेठ पाटील, अनंत पाटील, जेष्ठ पत्रकार माधवराव पाटील जगदीश पारिंगे, विश्वास पाटील, अरुण दापोलकर, रामदास नाईक, धनंजय घरत, रायगड भूषण राजू मुंबईकर,वैजनाथ मुंबईकर, श्रीकांत मुंबईकर, नवी मुंबई चे समाज सेवक पांडुरंग आमले, विश्वास कणसे, पंकज दळवी, चिंतामन बेल्हेकर,नागाव चे माजी सरपंच परीक्षित ठाकूर, नगरसेवक तुषार ठाकूर आदी सह साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Be First to Comment