श्री कृष्णांनी खेळलेल्या खेळांचा विसर,आजची मुले मोबाईल मध्ये व्यस्त : ह.भ.प.रामदास भाई महाराज
सिटी बेल • काशिनाथ जाधव •
पाताळगंगा •
शरिराला जसा व्यायाम खेळ महत्वाचा आहे.तसा मनाला भगवंताच्या नामस्मरणांत गुंफले पाहिजे.खेळ खेळण्यासाठी श्री कृष्ण लहान मुले यांच्या समवेत खेळत असे.यामुळे सर्वांना आनंद समाधान मिळत होते.काल बदलत चालला आहे.खेळ खेळ्यामुळे शरिरात एक उर्जा मिळत असते.मात्र आजची तरुण,लहान मुले सर्वच विसरत चालली आहे.श्री कृष्णांनी खेळलेल्या खेळांचा विसर,आजच्या मुलांना पडला असून प्रत्येक मुले मोबाईल मध्ये गुंग असल्याचे पहावयास मिळत आहे असे मत ह.भ.प.रामदास भाई महाराज पाटील यांनी काल्यांच्या किर्तनात माजगांव येथे म्हटले.
माजगांव येथे गेली आठ दिवस अखंड हरिनाम साप्ताह आयोजन ग्रामस्थ,वारकरी,महिला मंडळ यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले होते.काल दीपोत्सवांच्या माध्यमातून सांगता करण्यात आली. गेले आठ दिवस भजन,कीर्तन,प्रवचन सुरु होते.गुरुवर्य शांतीब्रम्ह धर्माचार्य राष्ट्रभूषण,रायगड भूषण ह.भ.प.मारुती (दादा ) महाराज राणे कर्जत( हलीवली ) आणी ह.भ.प.मधुकर महाराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु होते आज या सप्ताहाची सांगता काल्यांच्या किर्तनांतून करण्यात आली.
काल्याचे किर्तन सौजन्य राजेश पाटील,गेले आठ दिवस किर्तन कारांचा सन्मान म्हणून विठ्ठलांची फ्रेम किशोर पाटील,नरेश पाटील,तसेच काल्याचा महाप्रसाद वै.गंगाबाई पंढरीनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ लक्ष्मीकांत सुर्याजी पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आली. तसेच सात दिवस भजन, प्रवचन,कीर्तन सेवा सौजन्याने म्हणून गावातील प्रतिष्ठित मान्यवरांनी केली.
यावेळी रामदास भाई पुढे म्हणाले की संत तुकाराम महाराज यांच्या वाणींचा प्रभाव मोठा होता आज ही अभंग उच्चारतांना पुढील अभंग सहज म्हणू शकतो. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी,कारण शरीर आणी वृत्ती हे वेगळे बीज आहे. हरिपाठ,किर्तन यांतून आनंद मिळतो.श्री कृष्णाने हुतुतू,हमामा,चेंडु फळी,हे जुना खेळ आहे.यांचा निर्माता कृष्ण आहे आता चेंडु फळीला क्रिकेट म्हणून संबोधले जाते.
आज खेळ खेळण्यात सुद्धा निवड केली जाते,यासाठी विवेक चातुर्य,आभ्यास लागतो.तसा. राजकारणात सुद्धा होत आहे.आज प्रत्येकाला चिंता आणी भिती ने ग्रासले आहे.यामुळे सकाळी उठल्यानंतर भगवंताचे नामस्मरण करा.यामुळे मानसिक आजार कमी होईल.
असे मत काल्यांच्या किर्तनात व्यक्त केले.
Be First to Comment