श्री हनुमान जयंती उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विपुल पारेख तर सचिव पदी विठ्ठल ममताबादे
सिटी बेल • उरण • विठ्ठल ममताबादे •
दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी श्री हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. उरण तालुक्यात मोठ्या भक्ती भावाने हा जन्मोत्सव साजरा केला जातो. उरण शहरातील बाझारपेठला लागून असलेल्या गणपती चौकातील प्रसिद्ध हनुमान मंदिरात हनुमान जयंती उत्साहात साजरी केली जाते. हे उत्सव श्री हनुमान जयंती उत्सव मंडळाच्या माध्यमातून साजरी केले जातात.
दरवर्षी या मंडळाचे कार्यकारी पदाधिकारी सदस्य निवडले जातात.यंदा शनिवार दिनांक 16 एप्रिल 2022 रोजी हनुमान जयंती आहे. ही हनुमान जयंती साजरी करण्यासाठी व विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठी एका मिटिंगचे आयोजन करण्यात आले होते. या मिटिंग मध्ये कार्यकारिणी निवडण्यात आली.
श्री हनुमान जयंती उत्सव मंडळाच्या अध्यक्ष पदी विपुल पारेख, उपाध्यक्ष भालचंद्र म्हात्रे, सचिव विठ्ठल ममताबादे, खजिनदार धनंजय भागवत महाराज,सह खजिनदार मधुकर नाईक, सल्लागार रोहित पाटील, व्यवस्थापक रघुनाथबुवा हातनोलकर,रेखा पाटील, निर्मला ममताबादे, नितीन वर्तक, गजानन भोईर व इतर कार्यकारिणी सदस्यांची अधिकृत पणे निवड करण्यात आली.
या मंडळाच्या कार्यकारिणी द्वारे हनुमान जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार असल्याचे मंडळातर्फे सांगण्यात आले आहे.
Be First to Comment