जेलमधील बंदीजनाकरीता संत तुकाराम महाराज भजन आणि अभंग स्पर्धांचे आयोजन
सिटी बेल • रसायनी • राकेश खराडे •
जेलमधील बंदीजनाकरीता जगद्गुरु संत तुकाराम महाराज भजन आणि अभंग स्पर्धेच्या नियोजनासंदर्भात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली.
यानंतर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सदर भजन स्पर्धेच्या नियोजनासंदर्भात राज्याचे तुरुंग महानिरीक्षक कुलकर्णी यांच्यासमवेत बैठक होणार असल्याचे शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांनी सांगितले.
सदरप्रसंगी राज्याचे गृह सचिव लिमये उपसचिव गद्रे आणि तुरुंग महानिरीक्षक कुलकर्णी यांच्यासमवेत शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया आणि राज्याचे उपाध्यक्ष नंदकुमार बंड, विश्वस्त शेखर पाटील आणि संगीत क्षेत्रातील ज्यांना चांगले ज्ञान आहे ते आपले औरंगाबाद शहराचे अध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे आणि विवेक थिटे उपस्थित होते.
शरद कला क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.राज्यातील जेलमधील बंदिजनांसाठी जगद्गुरु संत तुकाराम महाराज भजन आणि अभंग स्पर्धा या प्रतिष्ठानच्यावतीने घेण्यात येणार असून औरंगाबादमध्ये संत साहित्य संमेलनही भरविण्यात येणार असल्याचे प्रतिष्ठानचे रायगड जिल्हा सचिव राकेश खराडे यांनी सांगितले.
Be First to Comment