खांब पंचक्रोशी अखंड हरिनाम सप्ताहात बहुरूपी अवतरले सपत्नीक खंडेराय
सिटी बेल • गोवे-कोलाड • विश्वास निकम •
रायगड जिल्ह्यात तसेच रोहा तालुक्यातील नामवंत अशी वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेल्या श्री संत सेवा मंडळ विभाग खांब पंचक्रोशीतील 65 वा अखंड हरिनाम सप्ताह तालुक्यातील मौजे धानकान्हे येथे मोठ्या उत्साह आणि आनंददायी भक्तिमय वातावरणात संपन्न होत आहे.
या प्रसंगी येथील युवक व ग्रामस्थ अधिक श्रद्धेने सदरच्या कालावधीत विविध कला कुशलतेतून व विविध धार्मिक सद्भावणेतून पोशाख परिधान करत वारकरी संप्रदायाला अनुसरून बहुरूपी चल चित्राचे दर्शन दिले तर याला उपस्थित संप्रदाय मंडळ यांनी भरभरून प्रतिसाद दिला.
कोकण वारकरी संप्रदायाचे मूळ मार्गदर्शक तथा श्रद्धास्थान वै.स्वा. सु.नि. गुरुवर्य सदगुरु अलिबागकर महाराज,वै. गुरुवर्य गोपाळ बाबा वाजे,वै गुरुवर्य धोंडू बाबा कोल्हटकर , आदी संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या खांब पंचक्रोशीचा ६५ वा अखंड हरिनाम सप्ताह ह.भ.प. नारायण महाराज वाजे मठाधिपती पंढरपूर , ह.भ.प. दत्तू महाराज कोल्हटकर मठाधिपती पंढरपूर, यांच्या कुशल मार्गदर्शनातुन तसेच खांब पंचक्रोशीचे वैभव रायगड भूषण हभप मारुती महाराज कोल्हटकर यांच्या नेतृत्वाखाली हा अखंड नाम जप यज्ञ सोहळा खांब विभागातील मौजे धानकान्हे येथे संपन्न होत आहे .तसेच रविवारी आयोजित या सप्ताहाच्या सहाव्या दिवसाची कीर्तन सेवा विश्व हिंदू परिषदेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष ह.भ.प.एकनाथ महाराज सदगीर यांची संपन्न झाली.
यावेळी चक्क येथील युवकांनी बहुरूपी म्हणून अवतारीत चलचित्र देखावा म्हणून जेजुरीच्या खंडेराय व म्हाळसादेवीच्या हुबेहूब रूपात त्यांचे स्वागत करत उपस्थित भाविकांना एक वेगळा आनंद निर्माण करून दिला.
Be First to Comment