हरिदासाच्या भेटीमुळे समाधान मिळते : ह.भ.प.तुकाराम महाराज शिंदे
सिटी बेल • गोवे-कोलाड • विश्वास निकम •
आपले वाटोळे झाले तर पापामुळे पाप, ताप, दैन्य यापासून सुटका मिळवण्यासाठी हरिदासाची भेट महत्वाची आहे. एक कोटींचा बाथरूम असले तरी शेवटची अंगोळ रस्त्यावरच होणार सुख असेल पण समाधान नसेल त्यामुळे मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण माणसाला समाधान पाहिजे असेल तर हरिदासाची भेट महत्वाचे आहे.असे मत ह.भ.प.तुकाराम महाराज शिंदे (आळंदी ) यांनी खांब पंचक्रोशीतील धानकान्हे येथील अखंड हरिनाम सप्ताहात आयोजित कीर्तन सेवेत व्यक्त केले.
पाप ताप दैन्य जाय उठा उठी l जालिया भेटी हरिदासाची ll१ll ऐसे बल नाही अनिकांचे अंगी l तपे तिथे जगी दाने व्रते llध्रुll चरणींचे रज वंदी शळ पाणी l नाचती कीर्तनी त्यांचे माथा ll२ll भव तरावया उत्तम हे नाव l भिजो नेंदी पाव हात कांही ll३ll तुका म्हणे मला झाले समाधानl देखील चरण वैष्णवांचे या जगद् गुरु संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाच्या आधारे स्पष्ट करतांना ह.भ.प. तुकाराम महाराज शिंदे यांनी कीर्तनसेवेत सांगितले कि आपल्या जवळ असते तेव्हा त्याची किंमत कळत नाही महाराष्ट्र जेवढी संत मंडळी जन्माला आली ती अख्या जगात जन्माला आली नाही पण महाराष्ट्रात जेवढी संत मंडळी जन्माला आली ती लोकांना कळली नाही.ज्यांना कळाली त्यांचा उद्धार झाला. पैशांने समाधान मिळत नाही.हरिदासाची भेट व्हावे अशी वाटात असले तर त्याचा दास होणे महत्वाचे आहे.
यावेळी मठाधीपती ह.भ.प. दत्तु महाराज कोल्हाटकर, मारुती महाराज कोल्हाटकर,कृष्णा महाराज जाधव, नंदू महाराज तेलंगे,बमुगडे महाराज, गायनचार्य रविंद्र मरवडे,सचिन तेलंगे, विनोद कोस्तेकर, किरण ठाकूर, गणेश दिघे,मृदूंगचार्य ज्ञानेश्वर महाराज दळवी ज्ञानेश्वर कोल्हाटकर, अतिश कदम, तसेच खांब पंचक्रोशीतील कार्यकारी मंडळ,रोहा तालुक्यातील नागरिक, धानकान्हे गाव कमेटी,समस्त ग्रामस्थ, महिला मंडळ व तरुण वर्ग उपस्थित होते.
Be First to Comment