Press "Enter" to skip to content

अहमदनगर येथे दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत

सरपंच सेवा संघाचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

सिटी बेल • अहमदनगर • सुनिल ठाकूर •

महाराष्ट्र राज्यातील सरपंचासाठी कार्यरत असलेल्या सरपंच सेवा संघाच्या माध्यमातून अनेक गाव आदर्श तयार करण्याचे तसेच सरपंचांना सन्मान मिळवून देऊन,त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्याच बरोबर आपण समाज्याचे काही देणे लागतो आहे ह्या हेतूने विविध उपक्रम राबवित असताना त्याचाच एक भाग म्हणून ‘मान कर्तृत्वाचा सन्मान नेतृत्वाचा ‘या राज्यस्तरीय विविध पुरस्कार देऊन विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करुन त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केले जाते.

त्याच अनुषंगाने “मान नेतृत्वाचा सन्मान कर्तुत्वाचा” राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी पुरस्काराचे वितरण आमदार निलेश लंके ,पद्मश्री राहीबाई पोपेरे ( बिजमाता), यादवराव पावसे संस्थापक सरपंच सेवा संघ हभप राजेंद्र गरूड महाराज वंदनाताई पोटे द्राक्षे बागायतदार संघाचे विजयराव तोडकर , डॉ गांडाळ सर उपसंचालक आरोग्य विभाग नाशिक विभाग बाबासाहेब पावसे संपर्क प्रमुख अमोल शेवाळे, आदर्श सरपंच दत्तात्रय डुकरे पाटील, कार्याध्यक्ष रविंद्र पावसे प्रदेशाध्यक्ष रोहीत पवार यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.

पुरस्काराचे स्वरूप सन्मान पत्र, मानचिन्ह,फेटा व शाल असे होते. राज्यस्तरीय पुरस्कारांमध्ये आदर्श सरपंच,उद्योगभुषण, पत्रकारिता, युवारत्न, प्रशासकीय सेवा, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय,कोरोना योद्धा, मिडीया, कृषी, व्यापार,कला, ऐतिहासिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. यावेळी राज्यभरातील सरपंच उपस्थित होते सन्मानित मान्यवरांचे राज्यभरात कौतुक होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.