रंगच्छंद कलाकारांनी महड येथील वरदविनायक मंदीरात साकारली भव्य दिव्य रांगोळी
सिटी बेल • काशिनाथ जाधव •
पाताळगंगा •
मुंबई पुणे महामार्गावर हे अष्टविनायका पैकी असेलेले महड गावातील वरद विनायक यांचे दर्शन घेण्यासाठी खालापूर ,चौक, खोपोली ,कर्जत , पनवेल ,रसायनी या परिसरातील हजारो भक्तांनी आपल्या लाडक्या वरद विनायकाचे दर्शन घेतले.त्याच बरोबर आज संकष्टि चतुर्थी निमित्ताने मॉं साहेब जिजामाता आणी छत्रपती शिवाजी महाराज यांची सुंदर अशी मनमोहक रांगोळी काढण्यात आली. तसेच गणेश भक्तांना दर्शन घेण्यासाठी वहानांची व्यवस्था तसेच थंड पाण्यांची व्यवस्था ठिक – ठिकाणी करण्यात आली होती.
या संकष्टि चतुर्थी च्या निमित्ताने (रंगच्छंद रांगोळी मंडळ )यांनी मॉं साहेब जिजामाता आणी छत्रपती शिवाजी महाराज तसेच किल्ले यांची प्रतिकृती रांगोळी माध्यमातून साकारण्यात आले.हे दृश भक्तगणांनाचे मन आकर्षिले जात होते.आणि आपल्या जवळ असलेल्या मोबाइल.मध्ये टिपण्याचा प्रयत्न करीत होते.
अशीच सुंदर रांगोळी कलाकार , रोशन पाटील, रोहित भोईर , रवी चौधरी , योगेश्री ढमाले , स्वप्नील गायकर, शुभम कुमरे , कामिनी पाटील, ज्योती पाटील ,हार्दिक घाग , पद्मिनी खाडे, नम्रता गोंधळी अदि कलाकारांच्या संकल्पनेतून साकारण्यात आली.
ही रांगोळी काढण्यासाठी ३० किलो रांगोळी वापर करण्यात आला.तसेच ह्या रांगोळी साठी २० तास एवढा कालावधी लागला.ही रांगोळी १०/३० फुट असून यामध्ये सप्त कलर्स तांबडा,नारंगी,पिवळा,हिरवा,जांभळा,निळा, पांढरा लाल, अदि रंगाचा वापर करण्यात आला.
Be First to Comment