सिटी बेल • उरण • विठ्ठल ममताबादे •
उरण तालुक्यातील विंधणे गावचे शेतकरी कुंटूबातील सुपुत्र कै.सुनिल बाळकृष्ण भोईर यांचे अल्पशा आजाराने ६१ व्या वर्षी दुःखद निधन झाले.
त्यांच्या कारकीर्दी मध्ये त्यांनी भूमीविषयक बागायती योजनेचे तसेच अन्य शेतकी योजना येथील शेतक-यांना समजवून येथील आपल्या शेतकरी बांधवाना कसा फायदा होईल त्याकडे ते सातत्याने आपल्या परिसरातील शेतकरी बांधवाना सांगून मार्गदर्शन करत असत. त्याच प्रमाणे ते उरण परिसरातील वारकरी सांप्रदाय समाजाशी जोडून घेऊन गेल्या २२ वर्षा पासून श्रीक्षेत्र पंढरपूर वारी करून वारीचे महत्व येथील जनतेला सांगून हरीनामामध्ये अनेक भाविकांना सामावून घेतले असून येथील कष्टकरी शेतकरी समाजासाठी आहोरात्र झटत होते.
काहीच वर्षा पुर्वी येथील शेतक-यांच्या मानगुटीवर रीलायन्सच्या S.E.Z चे भूत बसणार आहे हे ओळखून सुरवातीला नरेश जोशी,सुनिल भोईर,कायदे तज्ञ अॅड.डि.के.पाटील हे S.E.Z नेमका काय आहे आणि त्याचे धोरण तसेच त्याचा आराखडा समजून घेण्यासाठी S.E.Z च्या कार्यालयात चौकशी करण्यासाठी गेले असता तेथील S.E.Z च्या वरिष्ठ अधिका-याची भेट घेऊन ही योजना काय आणि याचा आराखडा कसा आहे तसेच या योजनेचा येथील शेतक-यांना काय आणि कुठल्या प्रकारे लाभ होईल अशी विचारणा केली असता सदर अधिका-यांनी कुठलीही माहिती देण्यास नकार दिला असता तिथेच S.E.Z च्या कार्यालयात त्या वरिष्ठ आधिका-याला सांगितलं की एक इंच पण जमिन आम्ही तुमच्या S.E.Z ला मिळवू देणार नाही असे ठणकावून सांगून या परिसरातील शेतक-यांच्या गाठीभेटी घेऊन सर्व शेतक-यांना एकत्र करून चळवळ करण्याचा निश्चय करून महामुंबई संघर्ष समितीची स्थापना केली.
यासाठी तन-मन-धनाने तसेच पडेल ते काम करण्याची तयारी दर्शवून तसेच पि.बी.सावंत आणि दत्ता पाटील यांच्या आदेशाचे पालन करून येथील कष्टकरी,गोरगरीब शेतक-यांना न्याय मिळवून देण्याचा निर्धार केला. गावोगावी बैठका घेण्यास सुरवात करून वरील महामुंबई संघर्ष समितीच्या स्थापने पासून खजिनदार पदाची धुरा ठामपणे सांभाळली असून आज त्याचे फलीत म्हणून या भागातून S.E.Z हद्दपार करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.आज येथील शेतकरी त्यांची तळमळ आणि जिद्द कधीच विसरणार नाही.
त्यांच्या मागे दोन मुले, एक मुलगी, पत्नी असा परिवार असून तिन्ही मुले उच्च शिक्षित असून डाॅक्टरेट करत असून त्यांच्या जाण्याने मनमिळावू शेतकरी मित्र गमावल्याने येथील परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या अंतविधीसाठी ह.भ.प.एकनाथ महाराज,आमदार महेश बालदी, आमदार बाळाराम पाटील ,कायदेतज्ञ अॅड.डि.के.पाटील साहेब,अॅड.भारत नवाळे यांच्या सहित महामुंबई S.E.Z संघर्ष समितीचे कार्यकर्ते, पंचक्रोशितील राजकीय पदाधिकारी, तसेच येथील शेतकरी मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहून अश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला.








Be First to Comment