Press "Enter" to skip to content

कामगारांना १२,०००/- ची पगारवाढ

रसायनीतील डिंपल ड्रम कंपनीतील कामगारांना भरघोस पगार वाढ

सिटी बेल • रसायनी • राकेश खराडे •

रसायनी तुराडे हद्दीतील डिंपल ड्रम कंपनीत कामगारांना पगारवाढ झाल्याने कामगार कुटूंबियांत आनंदाचे वातावरण आहे. गणेश नाईक ( श्रमिक सेना यूनियन संस्थापक ), श्रमिक सेना यूनियन अध्यक्ष संजीव नाईक व कंपनीच्यावतीने कंपनी मालक दिनेश कोटडिया, अमित कोटडिया यांच्यात चर्चा होवून कामगारांच्या हितासाठी करार झाला.

यावेळी कामगारांना रुपये १२,०००/- पगार वाढी च्या करारावर स्वाक्ष-या करण्यात आल्या .त्याप्रसंगी यूनियन सेक्रेटरी चरण जाधव ,कंपनीकडून विकास पारेख ,शैलेश पांडे ,तसेच कामगार प्रतिनिधि रघुनाथ भोईर, मनोहर ऐरुनकर,सुधीर देशमुख, महादेव म्हात्रे , गौतम मोकल,राजेन्द्र मांडे हे हजर होते.

भरगोस पगार वाढीच्या करारामुळे कामगांरात व परिसरात आनंदाचे वातावरण असून कार्यकारीणी व यूनियन श्रमिक सेना यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कै.बालमशेट शेट्टी यांच्या पुण्यतिथीनिमित्त ही भेट असल्याची कामगारांत चर्चा असून भरघोस पगारवाढ झाल्याने कामगारांत नवचैतन्य संचारले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.