Press "Enter" to skip to content

झेप सामाजिक संस्था व स्थानिक प्रकल्पग्रस्त संस्थेचा पुढाकार

उलवे नोड येथे प्रथमच MPSC / UPSC मार्गदर्शन शिबीर संपन्न

सिटी बेल • उलवे • सुनिल ठाकूर •

उलवे नोड येथे प्रथमच झेप सामाजिक संस्था व स्थानिक प्रकल्पग्रस्त संस्था यांच्या मार्फत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन कोपर तलावाजवळ जागतीक महिला दिना निमित्त होतकरु मुलांसाठी MPSC ( राज्य लोकसेवा आयोग ) व UPSC ( संघ लोकसेवा आयोग ) ह्या दोन स्पर्धा परिक्षांचे मोफत मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते.

सदर शिबिरात प्रा. प्रविण पाटील सर M.A.M.Phil,UGC-SET, LL.B, DLL&LW, MCJ यांनी मार्गदर्शन केले.या वेळी सुविधा वेती, भाग्यश्री ताई, अनिल पाटील व गौरव म्हात्रे यांनी देखील आपले मत व्यक्त केले.

गावोगावी जाऊन MPSC / UPSC परीक्षेसाठी मुलांना तयार करुन ४०-५० मुलांच्या ग्रुप ला मोफत मार्गदर्शन करुन लवकरच पनवेल उरण तालुक्यातुन IAS / IPA अधिकारी तयार करण्याचे आश्वासन स्थानिक प्रकल्पग्रस्त संस्थेचे अध्यक्ष गौरव म्हात्रे यांनी दिले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.