सामाजिक कार्यकर्ते अस्लम लोगडे यांनी देवन्हावेतील छत्रपती विद्यालयास प्रयोगशाळेच्या कामास केले सहकार्य
सिटी बेल • काशिनाथ जाधव •
पाताळगंगा •
देवन्हावे येथील छत्रपती विद्यालय या शाळेत छोटा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तर कार्यक्रमात समाजसेवक तथा उदयोजक अस्मल लोगडे यांनी स्वखर्चाने या प्रयोगशाळा पूर्ण करण्याच्या कामास सहकार्य करित मदतीचा हात दिल्याने लोडगे यांच्या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक होत असून प्रयोगशाळेचे काम पूर्ण झाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळाला. तर या शाळेचा सर्वागीण विकास व्हावा या हेतूने शाळेय समिती अध्यक्ष भास्कर लांडगे अथक प्रयत्न करित असताना समाजसेवक अस्लम लोडगे यांनी दिलेल्या मदतीमध्ये अध्यक्ष लांडगे याचा मोठा खारिचा वाटा असल्याचे मत शिक्षक वर्गानी व्यक्त केले.
देवन्हावे येथील शाळेस समाजसेवक तथा उदयोजक अस्लम लोगडे यांनी एक प्रयोगशाळा स्वखर्चाने विज्ञान दिनाचे औचित्य साधून प्रलंबित प्रयोग शाळेचे काम पूर्ण झाल्याने या प्रयोग शाळेचे उघ्दाटन जॉइंट डायरेक्टर इंडस्ट्री हेअलथ अँड सेफ्टी विक्रम कटमवार तसेच छत्रपती विद्यालय देवन्हावे अध्यक्ष भास्कर लांडगे यांच्या हस्ते पार पडले. तर श्रीनिवास कुंटे, दिवाकर पिल्ले, नारायण कट्टी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले असून कार्यक्रमास पाहुणे सामाजिक कार्यकर्ते संदीप पाटील, अँड.जयेश तावडे, अंकुर भोपतराव आदी उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका वीणा देशपांडे, धरणे सर, भल्ला सर, गायकवाड सर, कुंभार सर, दिवटे सर यांनी मेहनत घेतली.
देवन्हावे येथील प्रयोग शाळेचे काम काही वर्षापासून प्रलंबित असताना या प्रयोग शाळेचे काम पूर्ण व्हावे यासाठी शाळेय समिती मेहनत घेत असताना प्रयोग शाळेचे प्रलंबित काम अस्लम लोगडे यांच्या माध्यमातून पूर्ण झाल्याने आता विद्यार्थ्यांना विज्ञान धडे चांगल्या पध्दतीने गिरवता येतील.
भास्कर लांडगे (शाळेय समिती अध्यक्ष)








Be First to Comment