सिटी बेल • रसायनी • राकेश खराडे •
सेंट विल्फ्रेड कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात इंटर कॉलेजिएट नृत्य व संगीताचा कार्यक्रम प्रेक्षक व स्पर्धकांच्या उपस्थितीत जी . डी . बडाया सभागृहात पार पडला.या कार्यक्रमासाठी १०७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
कार्यक्रमासाठी संगीतकार राहुल सोनावणे , नृत्यदिग्दर्शक श्रेया रस्तोगी व अभिनेता रविश राठी उपस्थित होते.सेंट विल्फ्रेड कला , वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य अनिरूद्ध ऋषी , फार्मसी कॉलेजचे प्राचार्य दिनानाथ झाडे , लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ.मृत्युंजय पांडे , व इंजिनीअरींगचे प्राचार्य डॉ.धर्मेंद्र दुबे आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.डॉ . मृत्युंजय पांडे डॉ.धर्मेंद्र डुबे यांच्या हस्ते स्पर्धेमध्ये विजेत्यांना रोख रक्कम प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेत गायन स्पर्धेमध्ये प्रथम युक्ता पाटील ( विश्वनिकेतन कॉलेज ), द्वितीय प्रशांत पाटील ( छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ ), तृतीय राज कांबले ( सेंट विल्फ्रेड इन्स्टिटयुट ऑफ फार्मसी ) ,सोलो डान्स मध्ये प्रथम मानसी रामगुडे ( सेंट विल्फ्रेड इन्स्टिटयुट ऑफ फार्मसी ), द्वितीय देवेश सॅलीयन ( एस . के . कॉलेज ), तृतीय शैली लेले ( सेंट विल्फेड कॉलेज ), गृप डान्स मध्ये प्रथम सिद्धार्थ शर्मा आणि संघ ( एस . के . कॉलेज ), द्वितीय धिरज जाधव आणि संघ ( के . एम . सी कॉलेज ), तृतीय राहुल सिंग आणि संघ ( एम . एन . आर इंटरनॅशनल स्कुल ) यांना गौरवण्यात आले . संस्थेचे सचिव केशव बडाया यांनी विजेत्यांचे कौतुक केले . ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तपस्या पाटील आणि त्यांचे सहकारी यांनी अथक परिश्रम घेतले .








Be First to Comment