साई कृपा इंग्लिश अकादमीच्या विद्यार्थ्यांचा वार्षिक बक्षीस वितरण व गुणगौरव समारंभ संपन्न
सिटी बेल • उरण • विठ्ठल ममताबादे •
दोन वर्षांपूर्वी जगभरात कोरोनाच्या लॉकडाउनमुळे शांतता पसरलेली होती.मात्र आता हळू हळू दोन वर्षाच्या मध्यंतरानंतर परिस्थिती पूर्ववत होत असल्याने प्रा.प्रविण पाटील-संस्थापक
साईकृपा इंग्लिश अकॅडमी उलवे यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२१- २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक बक्षीस वितरण व गुणगौरव समारंभ २०२१-२०२२ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रवीशेठ पाटील-संस्थापक अध्यक्ष साई संस्थान, वहाळ, मनोहर शेठ ओवळेकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष बळीरामशेठ ओवळेकर, कुणाल पाटील तालुका उपाध्यक्ष अवजड वाहतूक सेना उरण, दीपक ठाकूर सदस्य पंचायत समिती उरण, रमाकांत म्हात्रे माजी सरपंच ग्रामपंचायत जसखार, भार्गव पाटील माजी सरपंच ग्रामपंचायत पागोटे तसेच इतर अनेक मान्यवर पालकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते.
साई कृपा इंग्लिश अकादमीचे संस्थापक प्राध्यापक प्रविण पाटील हे क्लासेस च्या माध्यमातून मागील २४-२५ वर्षांपासून अखंड ज्ञानदानाचे समाज कार्य करीत असून इयत्ता पहिली ते बारावी च्या पाठ्यपुस्तक बरोबरच इंग्लिश स्पीकिंग कोर्स ग्रामर कोर्सेस तसेच यू पी एस सी /एम . पी एस सी सारख्या स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन या अकादमीच्या माध्यमातून केले जाते.
या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी शुभेच्छा देवून या अकादमीच्या माध्यमातून आपल्या समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून जास्तीत जास्त शासकीय सेवेत नियुक्तीचा मार्ग मोकळा करुन देण्याचा आग्रह केला.








Be First to Comment