Press "Enter" to skip to content

खांदा कॉलोनी संघ ठरला उपविजेता

पी.डी.जी.पी. क्रिकेट सामन्यात खारघर फोनिक्स संघ विजयी

सिटी बेल • पनवेल • प्रतिनिधी •

पी.डी.जी.पी. आयोजित अटीतटीच्या क्रिकेट सामन्यात खारघर फोनिक्स संघ विजयी आणि खांदा कॉलोनी संघ उपविजेता ठरला.

खारघर फोनिक्स संघ मागील दोन वर्षे अंतिम सामान्यात पराभूत होत होता मात्र या वर्षी त्यांनी विजय मिळवला कर्णधार डॉ गौरव ठाकूर आणि उपकर्णधार ईश्वरदास पाटील यांनी ट्रॉफी स्वीकारली. महिलांच्या क्रिकेट सामन्यात कर्जत अथेना वारीयर्स संघाने पनवेल स्ट्रायकर्स वर विजय मिळवत सलग दोनवेळा ट्रॉफी मिळवली.

या वेळी उत्कृष्ट खेळाडू -आशिष करावकर (खांदा कॉलनी सुपर किंग) ,उत्कृष्ट फलंदाज -गौरव ठाकूर (खारघर फोनिक्स), , उत्कृष्ट गोलंदाज -रोहित चव्हाण(खारघर फोनिक्स ), उत्कृष्ट यशटीरक्षक -भजबळ (खांदा कॉलनी सुपर किंग)आदिना गौरवण्यात आले.

पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिसणर असोसिएशन दर वर्षी पनवेल आणि उरण भागातील डॉक्टरांचे क्रिकेट सामने आयोजित करत आहे. परिसरातील डॉक्टरांना एक विरंगुळा आणि शारीरिक फिटनेस हे ध्येय घेऊन हे क्रिकेट सामने खेळवले जातात असे पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिसणर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ वैभव मोकल यांनी सांगितले.

या डॉक्टरांच्या क्रिकेट सामन्या मध्ये (पुरुष संघ) तळोजा टायगर्स,उलवे युनायटेड,पनवेल वारीयर्स ,खांदा कॉलोनी ,करंजाडे लायन्स,कामोठे दबंग,खारघर फोनिक्स,खारघर वारीयर्स,पनवेल स्ट्रायकर्स ,कर्नाळा वारीयर्स,हे डॉक्टरांचे संघ आणि (महिला संघात ) पनवेल रेंजर्स, पनवेल स्ट्रायकर्स,रसायनी लायन्स, कर्जत अथेना वारीयर्स,रोहा रॉयल्स. या संघांनी भाग घेतलाहोता.

पी.डी.जी.पी चे क्रिकेट सामने यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष डॉ.वैभव मोकल,सचिव डॉ. रवींद्र राऊत, उपाध्यक्ष डॉ.सागर चौधरी, खजिनदार डॉ.संदेश बहाडकर डॉ.सागर ठाकूर,डॉ. सिद्धार्थ कौशिक,डॉ.सचिन पाटील,डॉ. सुदर्शन मेंटकर, डॉ. गजेंद्र सिलिमकर, डॉ दिनकर धनावडे,डॉ सचिन मोकल, डॉ अभिजित भोईर ,डॉ. सौ अनघा चौहान,डॉ सौ. सोनल शेठ आदीनी विशेष मेहनत घेतली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.