वार्दोली रा जी प शाळेमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात साजरा
सिटी बेल • पनवेल •
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त वार्दोली रायगड जिल्हा परिषद शाळेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांच्यात विज्ञानाविषयी गोडी निर्माण व्हावी या उदात्त हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिकांच्याद्वारे विविध वैज्ञानिक प्रयोगांचे अध्ययन केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला वर्गशिक्षिका ज्योती किसन भोपी यांनी राष्ट्रीय विज्ञान दिन का साजरा केला जातो याचे बाबत विद्यार्थ्यांना अवगत केले. विद्यार्थ्यांनी स्वयंस्फुर्तीने साहित्य जमवून प्रयोगांचे प्रात्यक्षिके दाखवत विज्ञान प्रदर्शन सादर केले. या समारंभाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जितेंद्र बताले, उपाध्यक्ष गुरुनाथ शेळके, शिक्षणप्रेमी जगदीश पाटील, समितीचे अन्य सदस्य, पालक उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मुख्याध्यापिका अरुणा सूर्यवंशी, केंद्रप्रमुख गीता तिगडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम यशस्वी होण्याकरता ज्योती किसन भोपी यांनी अथक परिश्रम घेतले.








Be First to Comment