कोकण एज्युकेशन सोसायटीच्या विद्या संकुलात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा
सिटी बेल • पनवेल •
कोकण एज्युकेशन सोसायटीच्या पनवेल येथील विद्या संकुलात राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने मराठी विज्ञान परिषदेच्या माध्यमातून विज्ञान प्रश्न मंजुषा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात संकुलातील व्हि के. हायस्कूल, के.व्ही.कन्याशाळा व इंदुबाई वाजेकार हायस्कूल या तीनही शाळांतील विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले होते. मराठी विज्ञान परिषदेच्या वतीने मकरंद कर्णिक यांनी पुढाकार घेऊन कार्यक्रमाचे आयोजन केले. प्रश्न मंजुषा कार्यक्रमातील सहभागी विद्यार्थांना मराठी विज्ञान परिषदेतर्फे पुस्तके बक्षीस देण्यात आली.

कार्यक्रमात प्लॅस्टिक वेस्ट वॉरियर्सच्या प्राजक्ता शाह यांनी प्लॅस्टिक वेस्ट रिसायक्लींगला पाठवण्यासाठी पनवेल मध्ये चालू असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमासाठी व्ही. के. हायस्कूलचे प्राचार्य श्री.पी. बी. ठाकूरसर अध्यक्षस्थानी होते.
के. व्ही. कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वैशाली वळवी मॅडम व इंदुबाई वजेकार विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती मनीषा पाटील मॅडम व प्राथमिक विभागाच्या श्रीमती मानसी कोकीळ मॅडम आवर्जून उपस्थित होत्या. तीनही शाळांतील शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.








Be First to Comment