रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्याकडून नागोठणे एज्युकेशन सोसायटीच्या उर्दू शाळेला संगणक भेट
सिटी बेल • नागोठणे •
नागोठणे येथील नागोठणे एज्युकेशन सोसायटीच्या उर्दू शाळेतील मुलांना कॉम्पुटर चे शिक्षण घेता यावे यासाठी संचालक मंडळाच्या सदस्यांनी रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांची भेट घेतली व आपली कैफियत मांडली.
महेंद्रशेठ घरत यांना शिक्षणाचे गांभीर्य व सामाजिक जाण असल्यामुळे तातडीने एक कॉम्प्युटर व प्रिंटर ची व्यवस्था करून शाळेकडे सुपूर्द केले.महेंद्रशेठ घरत यांची कार्यतत्परता पाहुण संस्थेच्या संचालकांनी जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांचे आभार मानले.
याप्रसंगी नागोठणे एज्युकेशन शिक्षण संस्थेचे संचालक सगीर अधिकारी, रोहा पंचायत समितीचे सद्स्य बिलाल कुरेशी, नागोठणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशपाक पानसरे ,सलमान पानसरे उपस्थित होते.








Be First to Comment