Press "Enter" to skip to content

महाबँकेचा नवी मुंबई वॉरिअर्स संघ विजयी

बँक ऑफ महाराष्ट्रने वर्धापन दिना निमित्त आयोजित केली क्रिकेट स्पर्धा

सिटी बेल • पनवेल • विजयकुमार जंगम •

बँक ऑफ महाराष्ट्राने नुकताच आपला ८७ वा व्यवसाय प्रारंभ दिन मोठ्या थाटात साजरा केला. ह्या अनुषंगाने बँकेने आपल्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व समाजा मध्ये एक सकारात्मक संदेश पोहचविण्यासाठी नवी मुंबई झोनने पनवेल येथे क्रिकेट स्पर्धा आयोजित केली.

ह्या स्पर्धेत नवी मुंबई झोनच्या वतीने अनुक्रमे नवी मुंबई वॉरिअर्स, वाशी चार्जेर्स, रायगड सुपरकिंग्स, कोकण डेअरडेव्हिल्स अशा चार चमूने सहभाग घेतला होता.
क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन बँकेचे कार्यकारी संचालक विजयकुमार यांनी केले.

यावेळी त्यांनी मार्गदर्शन करताना म्हटले की, आपली बँक बँकिंग उद्योगात चांगली प्रगती करून गाहकांना चांगली सेवा देत आहे. बँकेचे एन.पी.ए. फारच कमी आहेत व बँकेच्या कासा ठेवी खूपच चांगल्या आहेत. त्यांनी सर्व खेळाडूंशी संपर्क साधून सर्वांचे मनोबल वाढविले. या प्रसंगी त्यांनी सुंदर फटकेबाजी करून आपल्या उत्कृष्ट फलंदाजीचे दर्शन घडवून सर्वाना आश्चर्यचकित केले.

आपल्या अप्रतिम खेळाच्या जोरावर आपले साखळी सामने जिंकून नवी मुंबई वॉरिअर्स आणि वाशी चार्जेर्स या दोन चमूंनी अंतिम सामन्यात स्थान पक्के केले. अंतिम सामना वाशी चार्जेर्स आणि नवी मुंबई वॉरिअर्स यांच्यात अत्यंत चुरशीचा झाला. वाशी चार्जेर्स चमूने ८ शतकात १०२ धावांचे मोठे बलाढ्य असे लक्ष्य नवी मुंबई वॉरिअर्सला दिले. नवी मुंबई वॉरिअर्स चमूने सुरुवातीचे आपले दोन फलंदाज लवकर गमावल्या नंतर ही चमू दबावात आली. परंतु नवी मुंबई वॉरिअर्स चमूचे कर्णधार अभिनव शर्मा यांनी तुफान फलंदाजी करून एकवेळ अशक्य वाटणारे १०२ धावांचे लक्ष्य ७ षटकातच पूर्ण केले. अंतिम सामन्यात कर्णधार अभिनव शर्मा यांनी वादळी खेळी करून वाशी चार्जेर्सला सळोकी पळो करून सोडले. अभिनव शर्मा व सागर शिंदे यांनी मोठी भागीदारी करून अंतिम सामना सहज जिंकला.

या स्पर्धेत सर्वच बँक कर्मचाऱ्यांनी आपल्या चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले. ह्या स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण बघायला मिळाले. सर्व खेळाडू आपले तन मन धन टाकून आपल्या महाबँकेसाठी खेळात होते व आपले कौशल्य दाखवीत होते.

ह्या स्पर्धेत विविध पुरस्कार देऊन सुद्धा खेळाडूंना गौरविण्यात आले. सामनावीर उप झोनल मॅनेजर, अमित सुतकर, शृंखलेचा सर्वोत्तम खेळाडू अभिनव शर्मा, उत्कृष्ट गोलंदाज दर्शन शिंदे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण प्रशांत मोरे, उत्कृष्ट फलंदाज पूजन झा यांना गौरविण्यात आले.

याप्रसंगी बँकेच्या महाप्रबंधक व झोनल मॅनेजर, अपर्णा जोगळेकर यांनी सर्व सामान्यांना उपस्थित राहून खेळाडूंचे प्रोत्साहन वाढविले. त्यांनी समारोपीय भाषणात म्हटले की, बँक ऑफ महाराष्ट्राचा कर्मचारी हा कुठल्याही क्षेत्रात कमी नसून तो क्रिकेट खेळात सुद्धा अष्टपैलू आहे. हे आजच्या खेळातून सर्वानी सिद्ध करून दाखविले. ह्या समूह भावनेने आपण महाबॅंकेला प्रगती पथावर नेऊ असा विश्वास दाखविला.

सामन्याचे पारितोषिकाचे वितरण झोनल मॅनेजर, अपर्णा जोगळेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी उप अंचल प्रबंधक, अमित सुतकर, सहाय्यक महाप्रबंधक पिंकी राणी, मुख्य प्रबंधक दिलीपकुमार उपाध्याय, मनीषा शर्मा, चंदन कुमार, रवी बालचंदानी सुद्धा उपस्थित होते.

सामन्याचे धावते समालोचन उप अंचल प्रबंधक,अमित सुतकर अरविंद मोरे, दिलीपकुमार उपाध्याय, पुनीत कपाथिया, पुजन झा यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता अरविंद मोरे, सुशांत वर्मा, प्रसेनजीत अंकुश, ओंकार शिंदे, व गोपीचंद पाटेकर यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक,सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन अरविंद मोरे यांनी केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.