Press "Enter" to skip to content

शाळा फाऊंडेशन बार्शी आयोजित राज्यस्तरीय वत्कुत्व स्पर्धा

ज्ञानदा उस्तुरे वकृत्व स्पर्धेत जिह्यात पहिली तर राज्यात तिसरी

सिटी बेल • खांब-रोहे • नंदकुमार मरवडे •

शाळा फाऊंडेशन बार्शी, आयोजित राज्यस्तरीय वत्कुत्व स्पर्धेत रायगड जिल्ह्यातून ज्ञानदा उस्तुरे हिने वकृत्व स्पर्धेत जिह्यात पहिला तर राज्यात तिसरा क्र.संपादित करून सुयश संपादित केले आहे.

शिवजयंती महोत्सव २०२२ निमीत्त २ री राज्यस्तरीय आॅनलाईन वक्तृत्व स्पर्धा शाळा फाऊंडेशन बार्शी यांच्या वतीने घेण्यात आली.स्पर्धेचा विषय होता-“रयतेचा राजा” सदर स्पर्धेमध्ये इयत्ता १ली ते ५ वी पर्यंतच्या गट क्रमांक -१ यामध्ये महाराष्ट्रातील मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.

शैक्षणिक वारसा लाभलेल्या ज्ञानदाने आतापर्यंत विविध स्पर्धेत सुयश संपादित केले आहे. तर शाळा फाऊंडेशन बार्शी यांच्या वतीने घेण्यात आलेल्या व अत्यंत चुरशीच्या या स्पर्धेत ,ज्ञानदा गहिनीनाथ उस्तुरे इयत्ता पहिली रायगड जिल्हा परिषद शाळा तळे मराठी ता.तळा जि.रायगड या विद्यार्थीनीने राज्यातुन ” तृतीय क्रमांक” व रायगड जिल्ह्यातुन प्रथम क्रमांक पटकावुन तळा तालुका व रायगड जिल्हांचे नाव रोशन केले अाहे. ज्ञानदाने अभ्यासपूर्वक विषय हाताळणी,खणखणीत आवाज,चेहर्‍यावरील हावभाव,उत्तम सादरीकरण,व घेतलेल्या मेहनतीने हे यश संपादित केले आहे.

या यशाबद्दल विधान परिषदेचे आमदार अनिकेत तटकरे व तळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ.अस्मिता भोरावकर यांच्या हस्ते सत्कार करून विशेष कौतुकाची थाप दिली आहे.तर तिच्या या यशाबद्दल समाजातील सर्वच स्तरातुन कौतुक होताना दिसत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.