सिटी बेल • गोवे-कोलाड • विश्वास निकम •
रोहा तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा तळाघर येथे शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला .
बहुजन प्रतिपालक ,कुळवाडी भूषण जगविश्वविख्यात छत्रपती शिवाजी महाराज हे अखिल महामानव जातीचे उद्गाते होय सर्व धर्म समभाव ,समतेचे प्रतीक म्हणून लौकिक मिळवलेल्या एकमेव उद्वितीय छ. शिवरायांची शिवजयंती भारत वाशियांचा राष्ट्रीय उत्सव आहे ,आणि या उत्सवाचे औचित्य साधून रा.जि.प.शाळा तळाघर येथील विद्यार्थी वर्ग व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने ढोल ताश्यांच्या गजरात छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करण्यात आली.

या प्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध पोशाख परिधान करून शिवपूजन, मानवंदना, पालखीतुन शिवरायांची मिरवणूक, लक्ष्मी पत्रक, विद्यार्थ्यांनी पारंपारिक आखाडे, दांडपट्टा, लाठीकाठी बनाटी खेळणे, उड्या मारणे, मुलींनी फुगड्या खेळ तसेच तळवार चालवणे इत्यादी खेळ खेळत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाचा आनंद लुटला .
यावेळी तळाघर ग्राम पंचायतीच्या सरपंच सौ माधवी मनोज कळंबे,नवनिर्वाचित उपसरपंच संतोष हरिश्चंद्र माने, शाळा व्यवस्थापन समिती च्या अध्यक्षा सौ मोनिका मच्छिंद्र मोरे, केंद्रप्रमुख नारायण गायकर, पीएनपी माध्यमिक हायस्कूल तळाघरचे अध्यक्ष विठ्ठल मोरे, माजी सरपंच संदेश मोरे,ग्रामपंचायत सदस्य सौ विद्या रुपेश शिंदे, सौ विद्या देविदास शिर्के ,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सौ संगीता ज्ञानेश्वर मोरे, मोनिका मोरेश्वर मोरे, मीनाक्षी विनोद कमाने, प्रिया लीलाधर मोरे, राजश्री मोरे ,मानसी मोरे,सदाभाऊ मोरे,कराटे मार्शलचे प्रशिक्षक मेघेश मोरे,गाव कमिटी अध्यक्ष दत्ताराम मोरे, पोलीस पाटील मंगेश सखाराम मोरे,संतोष चव्हाण,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र मोरे,एकविरा आर्ट मंडळाचे अध्यक्ष- मच्छिंद्र मोरे, देविदास शिर्के, गोविंद कळंबे,लिंबाजी शिर्के,यशवंत मोरे,नथुराम माने आदी शिक्षक वर्ग विदयार्थी ग्रामस्थ युवक मंडळ ,युवती व शिवप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक विकास सुटे यांनी करत प्रस्तावित करतांना त्यांनी शिवजयंती बद्दल व श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी मोलाचे मार्गदर्शन केले तसेच शाळेतील विद्यार्थी वर्गाने व उपस्थित मान्यवरांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.शाळेतील शिक्षक विलास घोटेकर, किशोर कोळेकर, सौ वृषाली माळी, ज्योती महाजन,यांनी तसेच विद्यार्थी व युवकांनी हे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अधिक मेहनत घेत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात ग्रामस्थ युवक-युवती पालक यांच्या समवेत साजरी करण्यात आले व शेवटी शिक्षक कोळेकर यांनी या कार्यक्रमाचे आभार मानून विद्यार्थी वर्गाला गोड खाऊ वाटप करून सांगता करण्यात आली .








Be First to Comment