Press "Enter" to skip to content

अन्न सुरक्षा विभागाच्या नियमांचे उल्लंघन

उरणमध्ये नाल्याच्या काठावर उभी आहेत खाद्यपदार्थांची दुकाने

सिटी बेल • उरण • घनःश्याम कडू •

उरण शहरात खाद्यपदार्थांच्या दुकानांचे शहरात पेव फुटले आहे. चौकाचौकात, गल्लोगल्ली दुकाने लागलेली दिसतात. अन्न सुरक्षा विभागाच्या नियमांची ऐशीतैशी करून नाल्याच्या काठावरही खाद्यपदार्थ विकले जात आहेत.

खाद्यपदार्थांच्या दुकानांचे शहरात पेव फुटले आहे. चौकाचौकात, गल्लोगल्ली दुकाने लागलेली दिसतात. अन्न सुरक्षा विभागाच्या नियमांची ऐशीतैशी करून नाल्याच्या काठावरही खाद्यपदार्थ विकले जात आहेत. अस्वच्छतेत सर्रासपणे स्ट्रीट फूडची दुकाने सजली असून प्रशासन नियमांचे पालन करवून घेण्यात असमर्थ ठरले आहे.

दुकानदार अन्न व औषधी विभागाच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करीत आहेत. त्यांच्याकडे सुरक्षित साधनेही नाहीत. कारवाई होत नसल्याने त्यांची हिंमत वाढली आहे.स्वच्छतेकडे प्रचंड दुर्लक्ष नाल्याच्या आसपास घाण पसरलेली असते आणि अशाच परिस्थितीत काठावर खाद्यान्नाची दुकाने लागलेली आहेत.

नियमानुसार त्यांच्याकडे हॅन्डग्लोव्हज आणि डोक्यालाही शेफ हेड लावणे बंधनकारक आहे. मात्र कोणत्याच दुकानदाराकडे ते दिसत नाही. एवढेच नाही तर खाद्यपदार्थ झाकण्यासाठी आवश्यक जाळ्यांचा उपयोगही होताना दिसत नाही. अस्वच्छता आणि धुळीमध्ये हे पदार्थ विकले जात आहेत. या दुर्लक्षामुळे आजार होण्याचा धोका वाढलेला आहे.रस्त्यावरही अतिक्रमणस्ट्रीटफूडची दुकाने नाल्यांच्या काठावर आणि रस्त्यावरही लागलेली आहेत.

नगरपालिका या अतिक्रमणधारकांवर कारवाई करीत नाही. रस्त्यावर लागलेल्या दुकानांमधील गर्दीमुळे अपघात होण्याचीही शक्यता वाढली आहे. कारवाई होत नसल्याने त्यांची हिंमत वाढली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.