Press "Enter" to skip to content

वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

बांठीया विद्यालय नवीन पनवेल येथे केशरचंदजी बांठीया जयंती उत्सव

सिटी बेल • नवीन पनवेल •

के.आ.बांठीया महाविद्यालय आणि ज्युनिअर काॕलेज नवीन पनवेलमध्ये आज केशरचंदजी बांठीया यांची १३६ वी जयंती आणि विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाला.

विद्यालयाच्या तुडूंब भरलेल्या सभागृहामध्ये अत्यंत भारावलेल्या वातावरणात सरस्वती पूजन,दीपप्रज्वलन,ईशस्तवन व स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरूवात झाली.प्रारंभी विद्यालयाच्या संगणक शाळा प्रणालीचे उदघाटण मान्यवरांच्या शुभहस्ते फित कापून करण्यात आले.

महाविद्यालयाचे प्राचार्य भगवान माळी यांनी मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविकामधूनच उपस्थितांना पाहुण्यांची ओळख करून दीली.तसेच विद्यालयात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाबद्धल सविस्तर विवेचन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय जोशी सर आणि प्रमुख पाहुणे आप्पासाहेब मगर यांनी आपल्या अमोघ वाणीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.विविध विषयांवरती मार्गदर्शन आणि प्रबोधन करून पनवेल आणि परिसरात दानशूर म्हणून प्रसिद्धी पावलेले कैलासवासी केशरचंदजी बांठीया यांना १३६ व्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली.त्याचबरोबर कार्यक्रमांसाठी आमंत्रित केल्याबद्दल प्राचार्य माळी सरांना धन्यवाद दीले.

उपस्थित आदर्श विद्यार्थी,शिक्षक आणि शिक्षिकेत्तर कर्मचाऱ्यांना आदर्श पुरस्कार आणि बक्षिस वितरण करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात सत्कारमूर्तींचे अभिनंदन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुधागड एज्युकेशन सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी मा.मिलिंद जोशी;तर प्रमुख पाहुणे म्हणून मा.मोतीलालशेठ बांठीया आणि “जनसभा”वृत्तपत्राचे संपादक आप्पासाहेब मगर हे होते.व्यासपीठावरती महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननिय माळी सर,उपप्राचार्य एच.एन.दहिवदकर सर आणि उपमुख्याध्यापक सी.के.तिरमले सर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि निवेदन आपल्या मधूर आवाजाने सौ.तेजश्री पाटील व सौ.ललिता पवार यांनी आपला सांस्कृतिक वारसा जपत अत्यंत चोखपणे पार पाडले.

हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पर्यवेक्षक मा.बी.यु.महाजन,जे.के.कुंभार तसेच इंग्रजी माध्यमाच्या पर्यवेक्षिका सौ.खेडकर व सौ.कट्टा यांचे मोलाचे योगदान लाभले.

कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्य माळी सरांनी सर्व उपस्थितांचे आणि मान्यवर पाहुण्यांचे आभार माणून “पसायदानानंतर” कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.