रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोठीजुई येथे शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या स्मार्ट टीव्ही चे उद्घाटन
सिटी बेल • उरण • विठ्ठल ममताबादे •
रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोठीजुई येथे शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या स्मार्ट टीव्हीचे उद्घाटन उरण पंचायत समितीच्या वरिष्ठ विस्ताराधिकारी प्रियंका पाटील तसेच चिरनेर केंद्राचे केंद्रप्रमुख टी.जी म्हात्रे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
सुरुवातीला उपस्थित मान्यवरांना जास्वंदिच्या फुलांची रोपे देऊन मुख्याध्यापक सुभाष म्हात्रे यानी स्वागत केले. तद्नंतर शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या बावन इंची स्मार्ट टीव्हीचे पूजन करून व फित कापून उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम भोईर, उपाध्यक्षा तृप्तीताई बंडा, शाळेचे मुख्याध्यापक सुभाष म्हात्रे , शाळेच्या सहशिक्षिका रंजना म्हात्रे, संजय होळकर, दर्शन पाटील , संदीप गावंड सर,शर्मिला पाटील मॅडम, यतीन म्हात्रे , श्रीमती ज्योती बामनकर मॅडम व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.
शासनाचा सुंदर असा उपक्रम असून शाळेमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प असल्याने तसेच वायफाय सुविधा असल्याने त्याचा उपयोग निश्चितपणे विद्यार्थी वर्गाला होईल यात शंका नाही असे मत पाटील मॅडम यांनी काढले. मोठीजुई शाळाही आदर्श शाळा असल्याने शाळेचा कायापालट होत आहे. भौतिक सुविधाबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासाकडे देखील लक्ष दिले जाते ही चांगली बाब आहे.या शाळेने तंबाखू मुक्त शाळा, 75 कोटी सूर्यनमस्कार, शंभर दिवस वाचन प्रकल्प, गोष्टींचा शनिवार, असेच आगामी काळात विविध उपक्रम राबवून तालुक्यात वेगळा ठसा उमटवत आहे ही बाब अभिमानास्पद आहे.
असेच विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधावा असे आवाहन देखील केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिक्षक संजय होळकर यांनी केले.








Be First to Comment