Press "Enter" to skip to content

कुटुंबे लहान झाल्यामुळे होणारे परिणाम !

सिटी बेल लाइव्ह / वाचन कट्टा #

मध्यंतरी कांचन दीक्षित यांचा लेख वाचला; एका पंजाबी शेजार्यांविषयी त्यांनी लिहिले होते आणि निरनिराळ्या वयोगटातल्या त्यांच्या क्लाइंट शी बोलताना टसे अनुभव येतात हेसुद्धा सांगितले होते . लेख नेहमीप्रमाणेच अंतर्मुख करणारा होता.
कुटुंब पद्धतीचे विकेंद्रीकरण झाल्यामुळे किंवा कुटुंबे लहान झाल्यामुळे मुलांवर होणाऱ्या परिणामांबद्दल आपण नेहमीच बोलतो. नातेवाईक कमी झालेत, दूर गेले ,भावंडं तर जवळपास नाहीतच, त्यामुळे त्यांना कसा मानसिक ताण येतो, त्यांच्या सवयी बदलल्या आहेत इत्यादी इत्यादी….
या सगळ्याचा परिणाम निश्चितपणे घरातील कर्त्या स्त्री पुरुषांवर सुद्धा होतो ; कर्त्या म्हणजे यंग पेरेंट्स ! प्रत्येक वयाचे वेगवेगळ्या प्रॉब्लेम्स असतात ; म्हणजे नवीन लग्न झाल्यावर वेगळे , मुलं झाले की वेगळे , नाही झाले तर वेगळे आणि मुलं मोठे होताना चे वेगळे…. नवखे आई-बाबा असतात तेव्हा त्यांना घरातील इतर मंडळी सांभाळून घेतात, सपोर्ट करतात . जसजसे आई-बाबा मोठे व्हायला लागतात आजी आजोबा थकतात आणि मुलं मात्र तेवढीच सक्षम झालेली नसतात . कळत-नकळत कुटुंबाचा भार या नव्या आई-बाबांवर येतो.
मोठ्यांची भुणभुण, लहानांच्या मागण्या , समवयस्कांचे प्रेशर, पैशाची मॅनेजमेंट , नोकरीचा ताण, घरातील ऑर्गनायझेशन आणि पूर्ण होऊ घातलेली मोठी स्वप्न यांचा ताळमेळ बसवताना या बिचाऱ्यांची खरंच धडपड होते! त्यातच मग लग्नसराई, सणवार, वाढदिवस, आजारपणं, पंचाहत्तर्या…… जबाबदारी पैसे आणि ताण ही न थांबणारी त्रयी आहे!
होतं काय की हे सगळं त्यांच्या आईबाबांनी म्हणजे आत्ताच्या आजी-आजोबांनी हसत-खेळत केलेलं असतं आणि खूपच कमी साधने सोयीसुविधा असताना ; आणि याबद्दल ते सतत ऐकत आलेले असतात.. आजी-आजोबांनी हे सगळं कसं केलं ? तर त्यांच्या माणसांच्या मदतीने…
जवळच्या माणसांची उपलब्धता हा एक खूप मोठा क्रायसिस आहे आत्ताचा . म्हणजेच जेव्हा कुटुंब मोठी होती तेव्हा त्यातून निर्माण होणारा ताण व जबाबदाऱ्या पेलायला माणसेही तेवढीच होती. समजा दोघांचे भांडण झालं , वाद झाले तर त्यातून निर्माण होणारा स्ट्रेस शेअर करायला चौथा माणूस ताबडतोब किंवा तत्परतेने उपलब्ध होता . त्याला सांगितलं मन मोकळं केलं की बराचसा आवेग किंवा अॅक्युटनेस निवळत असे.
सासु बोलली, रागावली तरी जावेला सांगितलं कधी नणंदे जवळ कुरकुर केली की डोक्यातले तेच तेच विचार निघून जात होते एक लिसनर मिळाला तरी खूप फरक पडतो… आता तोच लिसनर नाहीये . नवऱ्याने बायकोला आणि बायकोने नवऱ्याला किती समजून घ्यायचं ? एकमेकांची बरीचशी दुःखे प्रॉब्लेम्स त्यांच्या गावीही नसतात , ते नेहमी वेगळेच विचार करतात.
तर हा ताण दूर होत नाही म्हणून मग पुन्हा महिलामंडळ, व्हाट्सअप ग्रुप , फेसबुक ग्रुप हे सर्व जॉईन केले जातात.. काळाची गरज म्हणून हे सर्व चांगले आहे ते सुरू करण्यामागचा हेतू ही उत्तम असतो पण प्रत्यक्ष सहवासाची, बोलण्याची, चहा पीत गप्पा मारण्याची सय त्याला म्हणजे वर्च्युअल प्लॅटफॉर्मला कशी येणार? एका ग्रुप मध्ये किमान 1000 मेंबर्स असतात तिथे सगळं सांगणं म्हणजे आपलं दुःख चव्हाट्यावर आणण्यासारखं आहे असं मला वाटतं त्यापेक्षा मग स्वतःच्याच एखाद्या व्यक्तीशी बोलून मोकळे होणे काय वाईट ? ‘भले भांडू पण एकत्र नांदू’ हे तर मला योग्य वाटते !
कारण ती व्यक्ति चं आपला कौन्सेलर ,लिसनर, कोच मि. त. वा. सगळं असते!
तुम्हाला काय वाटत?ं एका पर्सनल काउन्सेलर ची गरज आहे का या लहान कुटुंबातल्या सुपरवुमनला ?

लेखिका – विभावरी विटकर,
खारघर

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.