शिक्षकी सेवेतून गावातील नागरिकांशी कौटुंबिक नाते जोडणाऱ्या बिना कर्वे यांची आदर्शवत ज्ञानदानाची सेवा
सिटी बेल | काशिनाथ जाधव |
पाताळगंगा |
खालापूर तालुक्यात सावरोली रा.जी.प.मराठी शाळेत ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या शिक्षिका बिना बाळूदास कर्वे या २७ वर्ष सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्याने त्याचा निरोप समारंभ सावरोली येथे संपन्न झाला. यावेळी ग्रामस्थानी त्याच्या कार्याचा गौरव करीत जुन्या आठवणींना उजाळा देत ज्ञान दान करीत अनेक विद्यार्थी घडविण्याचे कार्य केल्याने त्याचे सेवा बजवीत असताना गावाशी एक आदर्शवत नाते निर्माण केल्याने ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी त्याच्या कार्याबद्दल कौतुक केले
सावरोली शाळेत २७ वर्षांपूर्वी अविवाहित शिक्षिका म्हणून वाघ बाई रुजू झाल्या त्यानंतर इयत्ता १ ली ते ७ पर्यत वर्ग असल्याने प्रत्येक वर्गाचा त्यांना ज्ञान असल्याने त्यांनी आपली सेवा बजावताना अनेक विद्यार्थी घडविले त्याच बरोबर गावातच वास्तव्यात असल्याने त्यांचे गावात प्रत्येक कुटूंबा बरोबर एक वेगळ नाते तयार केले त्यानंतर काही कालावधीत त्यांना तालुक्यात अनेक शाळेवर काम करण्याची संधी मिळाली त्याठिकाणी ही त्याच्या वाणीतून व शैक्षणिक ज्ञानदानातून वेगळी छाप पाडली.

त्यानंतर पुन्हा सावरोली शाळेवर रुजू होण्याची संधी मिळाली मधल्या कालाकात त्यांच्या वर मोठा आघात झाला त्याच्या पती चे अपघाती निधन झाले त्या मुळे सावरोली गावावर शोककळा पसरली होती त्यांच्या सांत्वनासाठी अनेकांनी हजेरी लावली ही त्याच्या बद्दल असणारी आत्मयिता दिसून आली सेवेतील कार्यकाळ या संकटातून मार्गक्रमण करीत असताना कौटुंबिक दुःख न दाखवता आपली ज्ञानदानाची सेवा पूर्ण ठेवली.
शुक्रवारी बिना बाळूदास कर्वे या सेवानिवृत्त झाल्याचे समजताच सावरोली चे उपरपंच नागेश मेहत्तर केंद्रप्रमुख नंदा मोहिते ग्राम पंचायत सदस्या नम्रता तटकरे,स्वाती किलंजे सामजिक कार्यकर्ते वसंत केदारी तंटामुक्ती अध्यक्ष संतोष केदारी प्रेस क्लब चे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत गोपाळे ,गजानन शिंदे शालेय समिती अध्यक्ष संजय पवार मुख्याध्यापक नारायण गाडे सह शिक्षिका जान्हवी सुर्वे,शोभा वाळुंज,स्वाती खैरे,पल्लवी चौलकर अंगणवाडी सेविका माधुरी चोगले,मंगळ मोहिते यासह ग्रामस्थांसाह माजी विद्यार्थी उपस्थित होते.








Be First to Comment