Press "Enter" to skip to content

कोलाड विभागीय कबड्डी स्पेर्धेचे आयोजन

धाक्सुद चिल्हे कबड्डी स्पर्धेत जय बजरंग आंबेवाडी संघ अंतिम विजेता

सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |

रोहा तालुक्यातील चिल्हे येथे धाक्सुद मंडळ चिल्हे आयोजित कोलाड विभागीय कबड्डी स्पेर्धेत जय बजरंग आंबेवाडी संघ अंतिम विजेता ठरला आहे.

रोहा तालुक्यातील धाक्सुद चिल्हे युवक मंडळांनी आयोजित केलेल्या कोलाड विभागीय कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व ग्रामस्थ नागरिक यांच्या विशेष सहकार्यातून आयोजित केलेल्या कबड्डी सोर्धेत अंतिम फेरीची अटीतटीची लढत जय बजरंग आंबेवाडी व गावदेवी बाहे यांच्यात रशिकप्रेशकांना हा सामना अतिशय रंगदार पहावयास मिळाला मोठी लढत मोठी आमने सामने अशी मजेदार झुंज रसिकांना भारावून सोडणारी ठरली आणी या लढतीत अखेर अंतिम विजयी म्हणून जय बजरंग आंबेवाडी संघ ठरला तर द्वितीय क्रमांकावर गावदेवी बाहे संघाला समाधान मानावे लागले .

अतिउत्साही वातावरणात रशिकप्रेशकाना आनंद देणाऱ्या या कबड्डी खेळाचा शुभारंभ कोलाड खांब देवकान्हे विभागातील युवकांचे स्फुर्तीस्थान न.शि.प्र.मं. खांब चे अध्यक्ष तसेच गोवे ग्राम पंचायतीचे सरपंच महेंद्र पोटफोडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी आंबेवाडी जि प गणाचे अध्यक्ष नरेंद्रशेठ जाधव ,खांब विभाग शेकाप जेष्ठ नेते मारुती खांडेकर सर ,हभप नारायण महाराज महाडिक रोहा तालुका भाजप उपाध्यक्ष विनायक महाडिक,ठमाजी महाडिक,सहदेव महाडिक,अनिल महाडिक, रायगड भूषण डॉ श्यामभाऊ लोखंडे,मंगेश लोखंडे,गाव कमिटी अध्यक्ष सुधीर लोखंडे,रवींद्र लोखंडे,पोलीस पाटील गणेश महाडिक,आदर्श शिक्षक नंदकुमार मरवडे सर,असोसिएशनचे अध्यक्ष महेश ठाकूर, तुकाराम महाडिक, आदी मान्यवर तसेच धाक्सुद मंडळाचे सर्व पदाधिकारी, कोलाड विभागातील कबड्डीपटू व क्रीडा रशिकप्रेशक बहुसंख्येने उपस्थित होते.

स्पर्धेत अंतिम विजेता आंबेवाडी संघ तर उपविजेता बाहे संघ तसेच तृतीय क्रमांकचे मानकरी सापया वरसगाव ,व चतुर्थ क्रमांक धाक्सुद चिल्हे संघांनी पटकावले आहे .तर स्पर्धेतील मालिकावीर आंबेवाडी संघाचा अखिलेश गाडगे उत्कृष्ट चढाईबहाद्दर बाहे संघाचा विजय माठल ,तर उत्कृष्ट पक्कड़ वरसगाव संघाचा नितेश सानप हे मानकरी ठरले असून विजय संघाना तसेच खेळाडूंना पारितोषिक व चषक देऊन गौरविण्यात आले.

आलेल्या सर्व प्रमुख पाहुणे यांचे स्वागत मंडळाच्या वतीने करण्यात आले व आयोजित स्पर्धा यशस्वी करण्यासाठी धाक्सुद मंडळ चिल्हे च्या सर्व पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.