ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत मोकल यांना मातृशोक
सिटी बेल | पाली/बेणसे | धम्मशील सावंत |
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते,महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांच्या मातोश्री कै. सौ. शारदा लक्षमण मोकल यांचे दि.(03) फेब्रुवारी मांडवखार ता. अलिबाग येथे दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 82 वर्ष होते. त्या मनमिळावू, परोपकारी व अत्यंत कष्टाळु होत्या. आपले पती लक्षमण महादेव मोकल यांना किराणा , आंबा, भाजीपाला खरेदी विक्री व्यवसायात त्यांची मोलाची साथ लाभली होती . आपल्या मुलांना संस्कारक्षम व उच्चशिक्षित घडविण्यात त्यांची भूमिका मोलाची ठरली.
मागील 8/10 वर्षापासून त्या गुढघेदुखी व रक्तदाबाने तसेच 3/4 महिन्यापासून अस्थम्याने आजारी होत्या. मागील महिनाभर खाजगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते , मात्र आजार बळावून त्यातच त्यांना मृत्यू आला.
त्यांचा जन्म हाशिवरे येथील प्रतिष्ठीत ठाकूर परिवारात झाला. त्यांचे वडील कै. धर्मा गणू ठाकूर हे पंचक्रोशीतील सुपरिचित व आदर्श व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या विचारांचा पगडा त्यांच्या वर होता.त्यांच्या आकस्मित जाण्याने हाशिवरे व मांडवखार परिसरात सर्वांनीच हळहळ व्यक्त केली. त्यांना माहेरी राधाबाय व सासरी शारदा(आई )असेच सर्वजण संबोधत असत. अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करून मोकल परिवाराचे सांत्वन केले.
त्यांच्या पस्च्यात पती श्री. लक्ष्मण महादेव मोकल .मुलगे चंद्रकांत मोकल, विद्याधर मोकल 3 मुली जावई नातवंड असा मोठा परिवार आहे. त्यांचे उत्तरकार्य( तेरावा) मंगळवार दि. 15 फेब्रुवारी 2022 रोजी मांडवखार येथे होईल.








Be First to Comment