प्रदीप जोशी यांचा निरोप सोहळा मेढा हायस्कूल येथे उत्साहात संपन्न
सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |
को.ऐ. सो. अलिबाग या मध्ये ३५ वर्ष सेवा करणारे शिक्षण मेढा हायस्कूलचे गुणवंत,यशवंत,ज्ञानवंत,किर्तीवंत म्हणून शिक्षक सर्वपरिचित असणारे प्रदीप आबा जोशी ३१ जानेवारीला आपल्या सेवेतून सेवानिवृत्त झाल्याने प्रदीप जोशी यांना निरोप व शुभेच्छा सत्कार सोहळा मेढा हायस्कूल येथे मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला.
शाळेचे चेअरमन भगवान गोवर्धने यांच्या अध्यक्षतेखाली व रोहा पंचायत समिती माजी सभापती लक्ष्मणराव महाले, युवा नेते मयुर खैरे,तंटामुक्त अध्यक्ष विलास खांडेकर,उपसरपंच उदय मोरे,माजी सरपंच विलास उंबरे,उद्योजक अरुण जोशी, मुख्याध्यापिका हेमलता देवकाते आदी मान्यवराच्या उपस्थितत प्रदीप जोशी यांच्या सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रातील यशस्वी कार्यबदल यांचे कौतुक करून गुणगौरव करण्यात आला.

यावेळी मेढा हायस्कूल चे शिक्षक रुंद त्यांच्या वतीने मानपत्र चेअरमन भगवान गोवर्धने यांच्या तर ग्रामपंचायतच्या वतीने भेट वस्तू श्रीफळ व शाल देऊन युवा नेते मयुर खैरे आणि ग्रामपंचायतीचे पदादीकारी यांनी सत्कार केला . तसेच त्यांचे नातेवाईक, मित्र परिवार,विद्यार्थी व त्याच्या चाहत्यांनी त्यांना भेट वस्तू देऊन शुभेच्छा दिले.जोशी सर हे मेढा हायस्कूल चे माजी विद्यार्थी असून ते बी.स.सी .बी ऍड शिक्षण घेऊन त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला. या शाळेत २९ वर्ष शिक्षक म्हणून प्रामाणिक सेवा केली. ७ वर्ष मेहंदळे हायस्कूल येतेही प्रामाणिक पणे सेवा केली.








Be First to Comment