विद्यार्थ्यांनी आपले ध्येय ठरवून लक्ष केंद्रित अधिक अधिक सरावावर करावे : नागेंद्र म्हात्रे
सिटी बेल | उरण | जी एच ठाकूर |
माणसाची भौतिक प्रगती ही त्याने मिळविलेल्या ज्ञानावर असते. ज्ञान हे शाश्वत आहे जो नम्रपणे ज्ञान घेत असतो त्यासाठी प्रगतीची दारे मोकळी असतात. हितवर्धक सामाजिक शैक्षणिक, संस्थेच्या वतीने नुकताच एस एस सी च्या विद्यार्थ्यांनासाठी व्याख्यानमालेचे आयोजन करून संपन्न झाले.
अश्या प्रकारचे आयोजन हे संस्थेच्या तर्फे गेली 19 वर्ष करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना उजळणी तसेच त्यांना एस एस सी बोर्ड परीक्षेत उत्तम गुण मिळवण्यासाठी अश्या प्रकारचे उद्बोधन हे केले जाते. शिबिरात नामवंत शिक्षक यांचे मार्गदर्शन हे विद्यार्थ्यांना मिळत असते. परीक्षेविषयी असणारी भीती ही जवळजवळ नाहीशी होते. विद्यार्थ्यांनी लक्ष किंवा आपलं ध्येय ठरवून त्यावर योग्य ते लक्ष केंद्रीत करून आपलं ध्येय गाठणे हे खूप खुप महत्वाचे आहे. विद्यार्थीनी जास्तीतजास्त महत्वाच्या टिप्स घेऊन त्याचे उपयोजन करणे गरजेचे आहे असे मत सारडे विकास मंच चे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे यांनी कार्यक्रम प्रसंगी बोलताना प्रकट केले.
परीक्षा संदर्भात विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कोणत्याही गोष्टीचं योग्य तो आराखडा ठरविणे योग्य असते असे सांगून ते पुढे म्हणाले, शिवकल्याण राजा आदर्श राजा, चरित्रसंपन राजा , दूरदृष्टीने विचार करणारा राजा , आचारशील , विचारशील सर्वज्ञपणे सुशील जाणता राजा तसेच इतर शैक्षणिक समस्या या वर विशेष लक्ष द्यायला हवे.

बल आहे एकीचे संघटनेचे असे मत पेण प्रायव्हेट कॉलेज चे चेअरमन मंगेश नेने सर यांनी केले. उद्बोधन वर्गात गणित , इंग्रजी व विज्ञानाच्या विषयांचे मार्गदर्शन भोंसले सर , घनश्याम पाटील सर या सारख्या तज्ज्ञांच्या अनमोल शिक्षक यांनी मार्गदर्शन केले. या मार्गदर्शन शिबिरात एकूण 70 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. माध्यमिक विद्यालय दादर , श्री केलंबा देवी माध्यमिक विद्यालय खरोशी व माध्यमिक विद्यालय सोनखर हे होते.
कार्यक्रम प्रसंगी पेण प्रायव्हेट कॉलेज चे चेअरमन मंगेश नेने सर , सारडे विकास मंच चे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे सर , सुयश क्लासेस आवरे चे अध्यक्ष निवास गावंड सर हितवर्धक सामाजिक संस्थेचे कार्याध्यक्ष दीपक पाटील , मार्गदर्शक गजानन पाटील , भोंसले सर घनश्याम पाटील सर, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन हे हितवर्धक सामाजिक शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष जी एच ठाकूर सर यांनी केले. अश्या प्रकारे स्वर्गीय हिरु धर्मा ठाकूर प्राथमिक इंग्लिश स्कूल दादर पेण येथे एस एस सी च्या विद्यार्थ्यांना साठी मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते.








Be First to Comment