Press "Enter" to skip to content

“हाॅटेल पाटीलराज” चे शानदार उद्घाटन

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील हाॅटेल पाटीलराज चे शानदार उद्घाटन

सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील टेंभुर्णी पासून ७ कि.मी. अंतरावर महामार्गलगतच नव्याने सुरु करण्यात आलेल्या मामा ढवळे-पाटील यांच्या “हाॅटेल पाटीलराज” चे शानदार उद्घाटन नुकतेच कौटुंबिक वातावरणात करण्यात आले.

मामा ढवळे-पाटील यांच्या हाॅटेल पाटीलराजच्या या उद्घाटन सोहळ्यास रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील नागोठणे येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, रायगडचे खासदार सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय व मामा ढवळे-पाटील यांचे स्नेही दिलीपभाई टके, नागोठणे-रायगड येथून प्रसिद्ध होणाऱ्या साप्ताहिक “बुलंद रायगड” चे संपादक व ज्येष्ठ पत्रकार शामकांत नेरपगार, साप्ताहिक “बुलंद रायगड” चे सल्लागार, पत्रकार अॅड. महेश मा. पवार हे खास करुन उपस्थित होते. याशिवाय “हाॅटेल पाटीलराज” चे मालक मामा ढवळे-पाटील, आबा ढवळे-पाटील, आबा मालक, नागाप्पा ढवळे, भाऊ ढवळे, तात्या पाटील, बबन साहेब ढवळे, कु. अनंत ढवळे-पाटील, कु. किरण ढवळे-पाटील आदींसह अनेक मान्यवर व मित्रपरिवार हाॅटेल पाटीलराजच्या उद्घाटन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित होता. दरम्यान माढा लिकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनीही दुस-या दिवशी “हाॅटेल पाटीलराज” ला भेट देवून हाॅटेल मधील जेवणाचा आस्वाद घेऊन प्रशंसा केली.

मामा ढवळे-पाटील यांनी काही वर्षापूर्वी अत्यंत खडतर परिस्थितीत आपल्या हाॅटेल व्यवसायाला भाड्याच्या जागेत सुरूवात केली होती होती. हाॅटेल व्यवसायात चांगला जम बसत असतांनाच आपल्या तरुण मुलाच्या अकाली निधनाने त्यांना प्रचंड प्रमाणात मोठा मानसिक धक्का बसला होता. या धक्क्यातून हळूहळू सावरत त्यांनी आपला हाॅटेल व्यवसाय स्वतःच्या जागेत सुरु करण्याचे ध्येय ठेवून जागा विकत घेतली. नंतर स्वतःच्या जागेत त्यांनी “हाॅटेल पाटीलराज” च्या रुपाने आपला हाॅटेल व्यवसाय आता नव्या जोमाने सुरु केला आहे.

“हाॅटेल पाटीलराज”ची विशेष खासियत म्हणजे उजनी धरणातील व त्या परिसरातील प्रसिद्ध “चिलापी” हा चविष्ट मासा, मटनाचा व गावरान कोंबड्याचा तांबडा-हिरवा रस्सा, स्पेशल थाळी तसेच आपल्या हाॅटेल मधील पदार्थांची चव चाखलेली व्यक्ती पुन्हा आपल्या हाॅटेल मध्ये येणारच असा मामा ढवळे-पाटील यांना असलेला प्रचंड विश्वास ! त्यामुळेच पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करतांना टेंभुर्णी जवळील या “हाॅटेल पाटीलराज” मधील लज्जतदार व मराठमोळ्या पदार्थांची चव चाखण्यासाठी एकदा या हाॅटेल ला आवश्य भेट द्याच असे आवाहन हाॅटेल मालक मामा ढवळे-पाटील यांनी केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.